रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 1530 चाचण्यात 137 पॉझिटीव्ह
अकोला,दि. 13(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट
राबविण्यात येत आहे. यात काल (दि.12) दिवसभरात झालेल्या 1530 चाचण्या झाल्या त्यात 137 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल
दिवसभरात अकोट येथे 268 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, बाळापूर येथे 92 चाचण्या झाल्या त्यात दोघांचे
अहवाल पॉझिटिव्ह आले, पातूर येथे 14 चाचण्या झाल्या त्यात चार
जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तेल्हारा येथे 30 चाचण्या
झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, मुर्तिजापूर
येथे 132 चाचण्या झाल्या त्यात 31 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोला महानगरपालिकेतून 875
चाचण्या झाल्या त्यात 73 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले,
अकोला आयएमए येथे 17 चाचण्या झाल्या त्यात दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 65 चाचण्या झाल्या
त्यात 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, हेगडेवार लॅब येथे आठ चाचण्या झाल्या त्यात तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला
तर अकोला येथे तीन, बार्शीटाकळी येथे दोन, व जिल्हा आरोग्य
कर्मचाऱ्यांचे 24 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे
एकूण 1530 चाचण्यात 137 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 84
हजार 957 चाचण्या झाल्या पैकी 6401 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा