७९१ अहवाल प्राप्त, २३९ पॉझिटीव्ह, २५७ डिस्चार्ज, सात मृत्यू

 अकोला,दि.१५(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ७९१ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ५५२  अहवाल निगेटीव्ह तर २३९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान २५७ जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर सात  जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

             त्याच प्रमाणे काल (दि.१४) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये ९२ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या ३२१७१(२५४५९+६५३५+१७७) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तर आज दिवसभरात आजचे एकूण पॉझिटिव्ह:- आरटीपीसीआर (सकाळ)-२३९+आरटीपीसीआर (सायंकाळ)-निरंक+रॅपिड अँटिजेंन टेस्ट-९२=३३१ एकुण पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण १७७११० नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे १७४४१२ फेरतपासणीचे ३८३ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २३१५ नमुने होते. आजपर्यंत एकूण १७६९७३ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १५१५१४ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

२३९ पॉझिटिव्ह

आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून प्राप्त अहवालात २३९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी २३९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ९३ महिला व १४६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट येथील २०, कौलखेड येथील १८, मोठी उमरी येथील ११, जलालाबाद व मलकापूर येथील प्रत्येकी १०, लहान उमरी, डाबकी रोड, शास्त्री नगर व तापडीयानगर येथील प्रत्येकी सात, जवाहर नगर, जीएमसी येथील प्रत्येकी पाच, बाळापूर, खडकी, गोरक्षण रोड व जूने शहर येथील प्रत्येकी चार, सुधीर कॉलनी, सिव्हील लाईन व गड्डम प्लॉट येथील प्रत्येकी तीन, पारस, शिव कॉलनी, मुर्तिजापूर, आकाशवाणी मागे, किर्ती नगर, रजपुतपुरा, गिता नगर, खदान, रतनलाल प्लॉट, खेडकर नगर, पातूर, राजंदा, कमला नगर, सिंधी कॅम्प, केशव नगर, शंकर नगर, रणपिसे नगर व महान येथील  प्रत्येकी दोन, तर उर्वरित कान्हेरी गवळी, शिवाजी नगर, पलोदी, ग्रीन व्हॅली, वाडेगाव, आसापूर, मोरेश्वर कॉलनी, वृंदावन नगर, गोयका लेआऊट, गुलजारपुरा, पाथर्डी, पिंपळनेर, माता नगर, राऊतवाडी, देवरावबाबा चाळ, रिधोरा, गायत्री नगर, रेणूका नगर, मालीपुरा, आझाद कॉलनी, भवानी पेठ,  भगीरथनगर,  ज्योती नगर, बाळापूर नाका, रुपचंदा नगर, अकोली खुर्द, रेल्वे क्वॉटर, बाबुळगाव, वानखडे नगर, वाशिम बायपास, कळवेश्वर, मणखॉ प्लॉट, आंबेडकर नगर, बलोदे लेआऊट, मेहकर, सातव चौक, कपिलवास्तू, शिरपूर, कृषी नगर, मराठा नगर, कलेक्टर हऊस, डिएचओ, राम नगर, राधाकृष्ण प्लॉट, शिवणी, मंगलवारा रोड, हिंगणा, शिवचरण पेठ, हिंगणा फाटा, वाघागड, वऱ्हाट बकाल, खोलेश्वर, व्दारका, गुल्लरघाट, वाडेगाव, लक्ष्मी नगर, राहेर, जठारपेठ, टाकळी, चांदुर, नयागाव, कंवर नगर, पिंपळखुटा, उजळेश्वर, तिवसा,  सिसामासा, अंतुलेनगर, सिसा भांदखेड, टाकळी व अंजनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. आज सायंकाळी कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.

दरम्यान काल रात्री(दि.१४) रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात ९२ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

सात जणांचा मृत्यू

दरम्यान आज सात जणांचा मृत्यूची नोंद झाली. त्यात कवासा ता.अकोट येथील ६२ वर्षीय महिला असून या महिलेस दि. ११ रोजी दाखल केले होते. तर अन्य राजंदा ता.बार्शीटाकळी येथील ५२ वर्षीय महिला असून या महिलेस दि. १४ रोजी मृतावस्थेत दाखल केले होते. तर अन्य जूने नयागाव येथील  ७५ वर्षीय पुरुष असून या पुरुषास दि. ९ रोजी दाखल केले होते, दोनद ता.बार्शीटाकळी येथील ६० वर्षीय पुरुष असून या पुरुषास दि. १३ रोजी दाखल केले होते, प्रसाद कॉलनी येथील ७५ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. १३ रोजी दाखल केले होते. जगजीवनराम नगर येथील ७५  वर्षीय महिला असून या महिलेस दि. १४ रोजी दाखल केले होते. तर निबंधे प्लॉट येथील ८०  वर्षीय पुरुष असून या पुरुषास दि. ११ रोजी दाखल केले होते,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

२५७  जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर  युनिक हॉस्पिटल येथून चार,  आयकॉन हॉस्पिटल येथून सात, ठाकरे हॉस्पिटल मुर्तिजापूर येथून एक, कोविड केअर सेंटर बार्शी टाकळी येथून चार,  हॉटेल स्कायलार्क येथून एक, खैरे उम्म हॉस्पिटल येथून पाच,  सहारा हॉस्पिटल येथून दोन, ओझोन हॉस्पिटल येथून एक, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून तीन, आधार हॉस्पिटल मुर्तिजापूर येथून एक, हार्मोनी हॉस्पिटल येथूनएक, बिहाडे हॉस्पिटल येथून पाच, समाज कल्याण वसतिगृह येथून सात,  आरकेटी कॉलेज येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून पाच, कोविड केअर सेंटर अकोट येथून दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २४ तर होम आयसोलेशन मधील १८२ अशा एकूण २५७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

४०६८  जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या ३२१७१(२५४५९+६५३५+१७७) आहे. त्यात ५३९ मृत झाले आहेत. तर २७५६४  जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४०६८ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

 

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ