2301 अहवाल प्राप्त, 573 पॉझिटीव्ह, 131 डिस्चार्ज, 17 मृत्यू

 

अकोला,दि.21(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2301 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1728  अहवाल निगेटीव्ह तर 573 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 131 जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर 17 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

  त्याच प्रमाणे काल (दि.21) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 181 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 35437(27690+7570+177)झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज दिवभरात एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 573 व रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 181 असे एकूण पॉझिटीव्ह 754 आहेत.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 187941  नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 185165 फेरतपासणीचे 385 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2391   नमुने होते. आजपर्यंत एकूण 187787 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 160097 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

573 पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात 573 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 225 महिला व 348 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-

मुर्तिजापुर- चार, अकोट- 93, बाळापूर-45, तेल्हारा-सहा, बार्शी टाकळी-18, पातूर-57, अकोला-350. (अकोला ग्रामीण-34, अकोला मनपा क्षेत्र-316)

दरम्यान काल (दि. 20) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात  181 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

17 जणांचा मृत्यू

आज दिवसभरात १७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात वाडेगाव येथील २८ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. १३ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य हाजी नगर येथील ५४ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १४ रोजी दाखल करण्यात आले होते, राहुल नगर येथील ३२ वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि. १७ रोजी दाखल करण्यात आले होते, मालेगाव ता. तेल्हारा येथील ४५ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते, तसेच शिवार येथील ५२ वर्षीय महिला असून या महिलेस दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते, शिवनी येथील ७१ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१९ रोजी दाखल करण्यात आले होते. तर शिसामासा  येथील ५० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१४ रोजी दाखल करण्यात आले होते. तर शेकापुर ता. पातूर येथील ७२ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते. गड्डम प्लॉट येथील ७५ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. १३ रोजी दाखल करण्यात आले होते. दहिहांडा ता.अकोट येथील ७८ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते. व्हिएचबी कॉलनी येथील ४२ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते. वानखडे नगर येथील ३१ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १५ रोजी दाखल करण्यात आले होते. वस्तापुर ता. अकोट येथील ३२ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १५ रोजी दाखल करण्यात आले होते. मुर्तिजापूर येथील ५२ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते. तर वृंदावन नगर येथील ५४ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच खाजगी रुगणालयातून दोघांचे मृत्यू झाले. त्यात आळसी प्लॉट येथील ६० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १४ रोजी  दाखल करण्यात आले होते. तर पातूर येथील ४२ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १७ रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

131  जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १७, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील २९, अकोला ॲक्सीडेंट येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील दोन, देवसर हॉस्पीटल येथील एक, हारमोनी येथील एक, बिहाडे हॉस्पीटल येथील नऊ, देशमुख मल्टीस्पेशलीटी येथील पाच, उपजिल्हा रुग्णालय येथील दोन, फतेमॉ नर्सिग होम येथील एक, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथील एक, सहारा हॉस्पीटल येथील दोन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील चार, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील चार, नवजीवन हॉस्पीटल येथील चार, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील एक, खैर उम्मत हॉस्पीटल येथील एक, कोविड केअर सेंटर अकोट येथील एक, इंदिरा हॉस्पीटल येथील एक, हॉटेल रिजेन्सी सहा,तर होम आयसोलेशन मधील ३७ असे एकूण १३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

5599  जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 35437(27690+7570+177)  आहे. त्यात 592 मृत झाले आहेत. तर 29246 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 5599 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ