रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 1578 चाचण्यात 107 पॉझिटीव्ह


 अकोला,दि. 19(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.18) दिवसभरात झालेल्या 1578 चाचण्या झाल्या त्यात 107  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

  काल दिवसभरात अकोट येथे 10 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. बाळापूर येथे 19 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. बाळापूर येथे 80 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तेल्हारा येथे 28 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. मुर्तिजापूर येथे 32 चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. अकोला मनपा तर्फे 1229 चाचण्या झाल्या त्यात 26 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. अकोला आयएमए तर्फे 15 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 103 चाचण्या झाल्या त्यात 36 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर हेडगेवार लॅब येथे 54 चाचण्या झाल्या त्यात 31 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर पातूर व जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रत्येकी चार चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. असे 1578 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 107 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.आतापर्यंत जिल्ह्यात 93 हजार 807 चाचण्या झाल्या पैकी 7267 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ