1087 अहवाल प्राप्त, 231 पॉझिटीव्ह, 274 डिस्चार्ज, सात मृत्यू


अकोला,दि.19(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1087 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 856  अहवाल निगेटीव्ह तर 231 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 274  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर सात जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

  त्याच प्रमाणे काल (दि.19) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 107 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 34201(26836+7188+177)झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज दिवभरात एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 231 व रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 107 असे एकूण पॉझिटीव्ह 338 आहेत.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 183940  नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 181213 फेरतपासणीचे 385 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2342   नमुने होते. आजपर्यंत एकूण 183759 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 156923 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

231 पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात 231 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 97  महिला व 134  पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-

मुर्तिजापुर-27, अकोट-नऊ, बाळापूर-चार, तेल्हारा-एक, बार्शी टाकळी-18, पातूर-12, अकोला-160. (अकोला ग्रामीण-15, अकोला मनपा क्षेत्र-145)

दरम्यान काल (दि.18) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात  107 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

सात जणांचा मृत्यू

आज दिवसभरात सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात काजळेश्वर, ता.बार्शीटाकळी येथील ६५ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१५ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य खदान येथील ५८ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. ११ रोजी दाखल करण्यात आले होते. बोरगाव मंजू येथील ७० वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि. १७ रोजी दाखल करण्यात आले होते. महान ता.बार्शीटाकळी येथील  २८ वर्षीय महिला असून या रुग्णास दि.१८ रोजी दाखल करण्यात आले होते. मोठी उमरी येथील  ३९ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते, तर येलवन बोरगाव मंजू येथील ६५ वर्षीय महिला असून या रुग्णास दि.१८ रोजी दाखल करण्यात आले होते. तर बोरगाव ता. मूर्तिजापूर येथील ६९ वर्षीय पुरुष रुग्णाचा खाजगी रुग्णालयात  उपचारा दरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

274  जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४७, ठाकरे हॉस्पीटल मुर्तिजापूर येथून चार, आयकॉन हॉस्पीटल येथून चार, जिल्हा स्त्री रुग्णालय येथून एक, समाज कल्याण मुलांचे वस्तीगृह येथून ११, देवसार हॉस्पीटल येथून तीन, अकोला ॲक्सीडेंट येथून चार, उपजिल्हा आरोग्य मुर्तिजापूर येथून दोन, हारमोनी हॉस्पीटल येथून एक, नवजीवन हॉस्पीटल येथून चार, अवघाते हॉस्पीटल येथून तीन, बिहाडे हॉस्पीटल येथून पाच, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथून  सात, आरकेटी येथून पाच, कोविड केअर सेंटर बाळापूर येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून एक, तर होम आयसोलेशन मधील १७१ असे एकूण २७४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

4673  जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 34201(26836+7188+177) आहे. त्यात 567 मृत झाले आहेत. तर 28961 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 4673  जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ