१९१९ अहवाल प्राप्त, १८६ पॉझिटीव्ह,२८७ डिस्चार्ज, तिघांचा मृत्यू

 अकोला,दि.८(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे १९१९ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १७३३ अहवाल निगेटीव्ह तर १८६  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान २८७   जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर तीन  जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

             त्याच प्रमाणे काल (दि.७) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये ११२  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या २९८५६(२३८७९+५८००+१७७) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तर आज दिवसभरात आजचे एकुण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर (सकाळ)-१३०+आरटीपीसीआर(सायंकाळ)-५६ + रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट-११२= २९८ एकुण पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण १६७१२० नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे १६४४६४  फेरतपासणीचे ३८१ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २२७५ नमुने होते. आजपर्यंत एकूण १६७००२ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १४३१२३ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

१८६ पॉझिटिव्ह

आज दिवसभरात १८६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सकाळी १३० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ४३ महिला आणि ८७ पुरुषांचा समावेश आहे. त्यात मोठी उमरी येथील नऊ,  रामदास पेठ व जीएमसी येथील प्रत्येकी सहा, मलकापुर आणि पोलीस हेडक्वार्टर येथील प्रत्येकी पाच, तेल्हारा आणि राऊतवाडी येथील प्रत्येकी चार, वरुड बिऱ्हाडे, आळशी प्लॉट, खडकी, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी तीन,  वांगरगाव, शास्त्री नगर, गांधी चौक, पोळा चौक, न्यू तापडीया नगर, जठारपेठ, डाबकी रोड, द्वारका नगर, व्याळा, बाळापूर, वृंदावन नगर, उगवा, यमुना नगर, रजपूतपुरा, येथील प्रत्येकी दोन तर उर्वरीत पारखेड, उकडीबाजार, जवाहर नगर, गोकुळ कॉलनी, पीकेव्ही,कोठारी वाटिका, जुने शहर, ताज नगर, दीपक च्व्हौक, रामी हेरीटेज, अकोट फैल, शंकरनगर, कौलखेड, दहिहांडा, खिरपुरी खु., गोरवा, जीएमसी क्वार्टर, जापान जीन, अक्कलकोट, मित्रनगर, नायगाव, राजंदा, मनोरमा कॉलनी, जांबा बु.,  गोकुळ कॉलनी, गुडदी, आदर्श कॉलनी, गायत्री नगर, तापडीया नगर, बार्शी टाकळी, महसूल कॉलनी, टाकळी बु., डोंगरगाव, उमरी नाका, शिवर, हरिहरपेठ, फडके नगर, शिवसेना वसाहत, बालाजी नगर, महात्मा फुले नगर, वाडेगाव, किनगाव,  कपिलानगर, शिवनी, अकोट, बोरगाव मंजू, पारस, हमजाप्लॉट, माळीपुरा, पातुर आणि कान्हेरी गवळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

तर  सायंकाळी ५६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १३ महिला व ४३ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट येथील सहा, मुर्तिजापूर येथील पाच, कौलखेड, मलकापुर, पारस येथील प्रत्येकी तीन, सोनारी, व्याळा,डाबकी रोड, शिवाजीनगर, जुने शहर, बाळापुर येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित गुरुकुल नगर, कानशिवणी, धोतरा,  रजपुतपुरा, कीर्तीनगर, कच्ची खोली, रचना कॉलनी, खडकी, वाई, कुटासा, पणज, पाथर्डी, चिखली, शंकरनगर, तुकाराम चौक, चान्नी, गाजिपुर, बटवाडी, कासारखेड, कोलोरी, हम्जा प्लॉट, म्हैसपूर, दुर्गा चौक आणि विवरा येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान काल(दि.७) रोजी रॅपिड अँटिजेंन चाचण्यात ११२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्येत व ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह संख्येत करण्यात आला आहे,याची नोंद घ्यावी.

तिघांचा मृत्यू

आज तिघांचा मृत्यू झाला. या तीनही महिला आहेत. त्यात अकोट फैल येथील ४७ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. या महिलेस दि.८ रोजी मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते. तर अन्य एक कासारखेड ता. बार्शी टाकळी येथील ६५ वर्षीय महिला असुन या या महिलेस दि.३ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य अकोट येथील ६२ वर्षीय महिला असून या महिलेस दि.२९ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

२८७ जणांचा डिस्चार्ज

आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून नऊ, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापुर येथून पाच, आयकॉन हॉस्पिटल येथून नऊ, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथून एक, कोविड केअर सेंटर अकोट येथून चार, सुर्यचंद्र हॉस्पिटल येथून तीन, सहारा हॉस्पिटल येथून तीन, नवजीवन हॉस्पिटल येथून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून पाच, बिहाडे हॉस्पिटल येथून चार, युनिक हॉस्पिटल येथून एक, उम्मत हॉस्पिटल मुर्तिजापूर येथून तीन, बॉईज होस्टेल येथून तीन , हॉटेल स्कायलार्क येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून चार तर होम आयसोलेशन मधील २२८ असे एकूण २८७ जणांचा डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

३७७१ जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या २९८५६(२३८७९+५८००+१७७) आहे. त्यात ४८९ मृत झाले आहेत. तर २५५९६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३७७१ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ