कोविडचा प्रतिबंधात्मक उपायोजनाचे काटेकोरपणे पालन करा पालकमंत्री बच्चू कडू यांचे आवाहन




        अकोला,दि.22 (जिमाका) - कोरोनाचा वाढता   प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने संचारबंदी घोषित केली आहे. तरी या काळात काही नागरिक विनाकारण फिरत असताना आढळून येत आहे. अशा व्यक्तीवर कार्यवाही करा व नागरिकांनी घरातच राहून प्रशासनास सहकार्य करावे असे, असे आवाहन राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात कोविड-19  संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर, शासकीय वैद्यकीया महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभीये, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार  यांची प्रमुख उपस्थिती होती.

            कोविड रुग्णांना कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय सेवेची अडचण निर्माण होणार नाही, याची काळजी जिल्हा व आरोग्य प्रशासनाने घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्सिजन, रेडमीसिविर इंजेक्शन तसेच बेड ची कमतरता पडणार नाही, याकडे सतत लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. तसेच अकोट, बाळापूर व तेल्हारा येथे कोरोना रुग्णाचे वाढते प्रमाण लक्षात घेता या ठिकाणी ऑक्सीजन प्लॉट तसेच 30 खाटाचे सुसज्ज असे कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्यात. शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या लक्षात घेता सूक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्र तयार करुन पॉझिटिव्ह रुगण बाहेर फिरणार नाही यासाठी मनपा प्रशासनाने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ