1754 अहवाल प्राप्त, 336 पॉझिटीव्ह, 468 डिस्चार्ज, 11 मृत्यू


अकोला,दि.30(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1754 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1418  अहवाल निगेटीव्ह तर 336 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 468 जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर 11 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

  त्याच प्रमाणे काल (दि.29) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 201 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 40160(31095+8888+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज दिवभरात एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 336 व रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 201 असे एकूण पॉझिटीव्ह 537 आहेत.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 206145 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 203268 फेरतपासणीचे 387 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2490 नमुने होते. आजपर्यंत एकूण 206061 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 174966 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

336 पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात ३३६ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १३९ महिला व १९७ पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-

मुर्तिजापुर-५२, अकोट-३७, बाळापूर-३४, तेल्हारा-२३, बार्शी टाकळी-१९ पातूर-१७, अकोला-१५४. (अकोला ग्रामीण-२८, अकोला मनपा क्षेत्र-१२६)

दरम्यान काल (दि. 29) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 201 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

11 जणांचा मृत्यू

आज दिवसभरात ११ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात मोठी उमरी येथील ७२ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य लोकमान्य नगर ता.बाळापूर येथील ८३ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २४ रोजी दाखल करण्यात आले होते, जूने राधाकिसन प्लॉट येथील ७१ वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. २८ रोजी दाखल करण्यात आले होते, कान्हेरी गवळी ता. बाळापूर येथील ७० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. ७ रोजी दाखल करण्यात आले होते. कोथळी ता. बार्शीटाकळी  येथील ५५ वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि. १५ रोजी दाखल करण्यात आले होते, शिवपूर येथील २० वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २८ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच राहेर ता. पातूर येथील ७४ वर्षीय पुरुष रुग्णास दि. १५ रोजी दाखल करण्यात आले होते, तेल्हारा येथील ८५ वर्षीय पुरुष रुग्णास दि. २७ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच तीन जणांचे खाजगी रुग्णालयात मृत्यू झाले. त्यात  मोठी उमरी येथील ६२ वर्षीय महिला असून त्याना दि. २७ रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य बाळापूर येथील ६८ वर्षीय पुरुष असून त्याना दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते, खदान येथील ७८ वर्षीय महिला असून त्याना दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

  468 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३४, केअर हॉस्पीटल येथील दोन, बिहाडे हॉस्पीटल येथील आठ, कोविड केअर सेंटर अकोट येथील १४, कोविड केअर सेंटर तेल्हारा  येथील तीन, हॉटेल स्कायलार्क येथील एक, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील एक, कोविड केअर सेंटर पास्टूल येथील सहा, अकोला ॲक्सीडेंट येथील चार, युनिक हॉस्पीटल येथील तीन, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील एक, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील एक, देवसार हॉस्पीटल येथील पाच, हॉटेल रिजेन्सी येथील चार, आयकॉन हॉस्पीटल येथील दोन, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, सहारा हॉस्पीटल येथील दोनदेशमुख हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील एक, आधार हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील ३७० असे एकूण ४६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

5302 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 40160(31095+8888+177) आहे. त्यात 689 मृत झाले आहेत. तर 34169 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 5302 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ