1314 अहवाल प्राप्त, 161 पॉझिटिव्ह, 643 डिस्चार्ज, दोन मयत

 


         अकोला,दि.4(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1314 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1153 अहवाल निगेटीव्ह तर 161  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 643  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर दोन जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

             त्याच प्रमाणे काल (दि.3) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 105  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 28831(23245+5409+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 161127 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 158492  फेरतपासणीचे 379 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2256  नमुने होते. आजपर्यंत एकूण 161055 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 137810 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

161 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात 161 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.  आज सकाळी १२२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ४६ महिला व ७६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील आळशी प्लॉट,राऊतवाडी व गजानन नगर येथील प्रत्येकी सहा, गोरक्षण रोड येथील पाच, कौलखेड, मलकापूर, डाबकी रोड, मोठी उमरी, लहरिया नगर, निवारा कॉलनी येथील प्रत्येकी तीन, लहान उमरी, शास्त्री नगर, जीएमसी, अडगाव ता.तेल्हारा, अंदुरा, देगाव, रणपिसे नगर, सिंधी कॅम्प, शिवार, आबेंडकर नगर, गुडधी, येलवन, चिखलगाव, मुर्तिजापूर व केलकर हॉस्पीटल येथील  प्रत्येकी दोन, तर उर्वरित लेडी हार्डींग, पंचशिल नगर, खरप, मोहिते प्लॉट, रेणूका नगर, आसरा कॉलनी, शिवणी, गांधी नगर, राधाकिसन प्लॉट, पार्तुडा, गिरी नगर, व्हिएचबी कॉलनी, अंबुजा, कोलसा, पारस कॉलनी, शेंडे धोत्रे, किर्ती नगर, खोलेश्वर, शिर्ला नेमाने, चतुभूज कॉलनी, दिपक चौक, तापडीया नगर,  अन्नपूर्णा नगर, बैद्यपुरा, सोनाळा, रामदासपेठ, व्दारका नगरी, जवाहर नगर, एमआयडीसी, माता नगर, खदान, उगवा, राधेनगर, बाशीटाकळी, दत्तवाडी, ज्योती नगर, कृषी नगर, दापूरा, मालेगाव, बोरगाव मंजू, वाडेगाव राठे, गोरेगाव, न्यु तापडीया नगर, निमकर्दा ता.बाळापूर, कळंबा बु., वरखेड ता.तेल्हारा, कासरखेड ता.बार्शीटाकळी, केशव नगर, नाईक नगर, उरळ व खिरपुरी ता.बाळापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसे  आज सायंकाळी ३९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २० महिला व १९ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट येथील १५, पारस व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी तीन, खानापूर वेस ता.अकोट येथील दोन, तर उर्वरित जूना अंदुरा, रौंदला, न्यु तापडीया नगर, राधाकिसन प्लॉट, गड्डम प्लॉट, रतनलाल प्लॉट, गोरक्षण रोड, सिंधी कॅम्प, मोठी उमरी, माना, गायत्री नगर, आपातापा रोड,जूना आळसी प्लॉट, शाहनूर ता.अकोट, चिंचपानी ता.अकोट व आसेगाव ता.अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

काल(दि.3) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालालत 105 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकूण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.  दरम्यान आज दिवसभरात आरटिपीसीआरच्या सकाळी  प्राप्त अहवालात 122, सायंकाळी प्राप्त अहवालात 39 तर रॅपिड चाचण्यात 105 असे एकूण 266 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

  दोघांचा मृत्यू

दरम्यान आज दोघांचा  मृत्यू झाला. त्यात पारस येथील ५९ वर्षीय पुरुष रुग्ण असून या पुरुषास दि. २९ मार्च  रोजी दाखल करण्यात आले होते,  तर आज सायंकाळी मुर्तिजापूर येथील ६३ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या पुरुषास दि. १ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

643 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सात, सहारा हॉस्पीटल येथील एक, युनिक हॉस्पीटल येथील एक, अकोला ॲक्सीडेंट येथील  चार, देवसार हॉस्पीटल येथील एक, नवजीवन हॉस्पीटल येथील दोन, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथील तीन, कोविड केअर सेंटर अकोट येथील दोन, समाज कल्याण हॉस्टेल येथील २५, आयकॉन हॉस्पीटल येथील दोन, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील दोन, हारमोनी हॉस्पीटल येथील एक, बिहाडे हॉस्पीटल येथील आठ, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, हॉटेल रिजेन्सी येथील सहा, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील एक, अवघाते हॉस्पीटल येथील एक, हॉटेल स्कायलार्क येथील तीन तर होम आयसोलेशन येथील ५७०, असे एकूण ६४३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती  जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

4336 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 28831(23245+5409+177) आहे. त्यातील 470 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 24025 आहे. तर सद्यस्थितीत 4336 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना