रुग्णसेवेसाठी आवश्यक मनुष्यबळाचा प्रस्ताव द्या, पालकमंत्री ना.कडू यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला निर्देश




अकोला,दि.22(जिमाका)- कोविड वार्डातील रुग्णांना लहान लहान बाबीत सेवा पुरविणेही आवश्यक असते, ह्या सेवा जर मनुष्यबळाआभावी पुरविता येत नसतील तर या रुग्णसेवेसाठी आवश्यक मनुष्यबळाची मागणी करण्यासाठी प्रस्ताव द्यावा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला दिले.

आज सायंकाळी ना.कडू यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट दिली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.मिनाक्षी गजभिये, डॉ.कुसुमाकर घोरपडे, डॉ.श्याम शिरसाम, डॉ.दिनेश नैताम,तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

यावेळी ना.कडू यांनी त्यांच्याकडे प्राप्त रुग्णांच्या तक्रारींच्या अनुषगाने विचारणा केली. यावेळी ना.कडू म्हणाले की, आपण सर्व डॉक्टर व आपले सर्व नर्स, आरोग्य कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहात. मात्र लहान लहान सेवांमध्ये उणीव भासल्याने रुग्ण नाराज होतात. तथापि या सेवांची उपलब्धता रुग्णांना करता यावी यासाठी मनुष्यबळाच्या टंचाईचा मुद्दा उपस्थित झाला.त्यावेळी ना.कडू यांनी मनुष्यबळ स्थानिकरित्या उपलब्ध करण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने प्रस्ताव द्यावा, असे निर्देश दिले.

रुग्णांना दिले जाणारे जेवण, उपचार सुविधा, ऑक्सिजन उपलब्धता व अत्यावश्यक औषधांची उपलब्धता याबाबतही त्यांनी माहिती घेतली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ