25 एप्रिल जागतिक हिवताप दिन जिल्ह्याची हिवताप निमुर्लनाकडे वाटचाल


 अकोला,दि. 23(जिमाका)- राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात हिवताप व किटकजन्य रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून जिल्हा हिवताप मुक्त करण्याकरीता जनजागृती मोहिम राबविण्याचे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी यांनी केले आहे.

हिवतापाचे लक्षणे - थंडी वाजुन ताप येणे, ताप हा सततचा असून शकतो किवा एक दिवस आड येऊ शकतो नंतर घाम येऊन अंग गार पडते, डोके दुखते, बऱ्याच वेळा उलटया होतात, हातपाय दुखणे यासारखे लक्षणे दिसल्यास सर्व सरकारी रुग्णालये, ग्रामिण रुगग्णालये, नागरी आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच हिवताप कार्यालयात जाऊन तेथील प्रयोगशाळेत रुग्णाचा रक्त नमुना तपासुन घ्यावा. रक्त नमुना दुषित आढळून आल्यास समुळ उपचार मोफत करण्यात येतो. हिवताप दुषित रुग्ण निघाला तरच त्याला हिवताप विरोधी औषधे देण्यात यावी. तसेच संशयीत हिवताप रुग्णास रक्त नमुना तपासणी नंतरच औषधोपचार करण्यात यावा. हिवताप हा आजार नोटीफाय डिसीज जरी नसला तरी खाजगी रुग्णालयांत निघालेल्या सर्व हिवताप दुषित रुग्णांची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी यांना दयावी.  

हिवताप आजारावर उपाययोजना :

आपल्या घराभोवती अथवा परिसरांत पाणी साचू न देणे, साचलेली डबकी वाहती करणे किवा बुजवणे, घराच्या खिडक्यांना डासविरोधी जाळया बसविणे, छतावरील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण लावणे, पाण्याची भांडी झाकून ठेवणे, घरगुती पाण्याचे साठे आठवडयातून किमान एकदा रिकामे करुन घासुन, पुसून, स्वच्छ करुन कोरडा दिवस पाळणे, टायर, फुटके कॅन, डबे यांची योग्य रीतीने विल्हेवाट लावून त्यात पाणी साठणार नाही याची काळजी घेणे. झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे, पुर्ण बाह्यांचे कपडे घालणे, संडासच्या व्हेंट पाईपला जाळी बसविणे, कायस्वरुपी डासोत्पत्ती स्थानामंध्य गप्पीमासे सोडणे. तसेच आठवडयातून एक दिवस कोरडा पाळणे.

जिल्ह्यामध्ये एकूण 31 प्राथमिक आरोग्य केन्द्र, एक उपजिल्हा रुग्णालय व चार ग्रामिण रुग्णालय कार्यरत असून हिवताप आजारावर सर्व ठिकाणी मोफत उपचार केला जातो. जिल्ह्यामध्ये हिवतापकरीता सेंटीनल सर्व्हेलन्स हॉस्पीटल्स फॉर मलेरियाकरीता उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर व ग्रामिण रुग्णालय अकोट या दोन ठिकाणी भरती होणाऱ्या दुषित रुग्णांस संपूर्ण मोफत उपचार करण्यात येतात. सन 2016 यावर्षी 3 लक्ष 51 हजार 498 रक्त नमुने  घेतले त्यात एकूण 92 हिवताप दुषित रुग्ण आढळले, तर 2017 मध्ये 3 लक्ष 24 हजार 684 नमुनेमध्ये 53 दुषित रुग्ण, 2018 मध्ये 3 लक्ष 36 हजार 538 नमुनेमध्ये 36 दुषित रुग्ण, 2019 मध्ये 3 लक्ष 44 हजार 660 नमुनेमध्ये 11 दुषित रुग्ण, 2020 मध्ये 2 लक्ष 70 हजार 438 नमुनेमध्ये नऊ दुषित रुग्ण तर मार्च 2021 मध्ये 57 हजार 922 नमुनेमध्ये एक दुषित रुग्ण आढळले असून जिल्हा हिवताप मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल चालू आहे.

किटकजन्य आजाराचे प्रतिबंधात्मक व उपचारातंर्गत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामिण रुग्णालय नागरिक आरोग्य केंद्रस्थित असलेले आरोग्य कर्मचारी यांचे मार्फत गृहभेटीव्दारे तापाचा रुग्णाचा शोध घेवून त्यांचेवर वयोगटानुसार औषधोपचार मोफत करण्यात येतात. नियमितपणे ग्रामिण व शहरी भागामध्ये साचलेले पाणी, डबके आहेत अश्या ठिकाणी डांस भक्षक गप्पीमासे मासे सोडण्यात येतात. ज्या भागामध्ये  वाढ झालेली आहे त्या भागात किटकनाशक फवारणी घरोघर करण्यात येते. जिल्ह्यामध्ये एकूण 197 गप्पीमासे पैदास केंद्र कार्यान्वीत असून त्यामधील गप्पीमासे आवश्यकतेनुसार डासोत्पत्तीस्थानांमध्ये गप्पीमासे सोडण्याची कार्यवाही निरंतर राबविण्यात येते. तसेच धुरफवारणीचे कार्य मागणीनुसार करण्यात येते. धुर फवारणी करीता लागणारे किटकनाशक औषधीचे मोफत वितरण जिल्हा हिवताप कार्यालयाकडून करण्यात येते. शहरी व ग्रामिण भागातील नागरिकांनी किटकजन्य रोगास आळा घालण्याकरीता आठवडयातून किमान एक दिवस कोरडा पाळावे. तसेच डासांच्या चाव्यापासून सुटका होण्याकरीता मच्छरदाणीचा वापर करुन ओडोमॉस, मॉस्क्युटो, काईलचा वापर करण्याचे आवाहन जिल्हा हिवताप कार्यालयाकडून करण्यात येत आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ