रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 1470 चाचण्यात 162 पॉझिटीव्ह


 अकोला,दि. 21(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.21) दिवसभरात झालेल्या 1470 चाचण्या झाल्या त्यात 162 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

  काल दिवसभरात अकोट येथे 105 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. बार्शीटाकळी येथे चार चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. पातूर येथे तीन चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तेल्हारा येथे 52 चाचण्या झाल्या त्यात 12 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. मुर्तिजापूर येथे 114 चाचण्या झाल्या त्यात 10 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. अकोला मनपा तर्फे 936 चाचण्या झाल्या त्यात 10 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. अकोला आयएमए येथे 40 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे 21 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 93 चाचण्या झाल्या त्यात 58 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर हेडगेवार लॅब येथे 95 चाचण्या झाल्या त्यात 59 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर  अकोला येथे चार, बाळापूर येथे तीन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. असे 1470 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 162 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.आतापर्यंत जिल्ह्यात 99 हजार 234 चाचण्या झाल्या पैकी 7811 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ