‘रेमडेसिविर’च्या बाटलीवर लिहा रुग्णाचे नाव व बिल क्रमांक; अन्न व औषधे प्रशासन विभागाचे आवाहन


अकोला,दि.२६(जिमाका)-  रेमडेसिविर या कोरोना रुग्णांच्या उपचारार्थ वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी औषध विक्रेत्यांनी इंजेक्शनच्या बाटलीवर रुग्णाचे नाव व बिल क्रमांक नमुद करावा, असे आवाहन सहायक आयुक्त(औषधे) वि.द. सुलोचने यांनी केले आहे.

या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोना उपचारासाठी वापरात येणारे औषध इंजेक्शन रेमडेसिविर हे काही समाजकंटकांकडून जादा किंमतीत विक्री करण्याचे प्रकरण पोलिस यंत्रणा व अन्न व औषध प्रशासनाव्दारे उघडकीस आणले असुन या प्रकरणी सिव्हील लाईन पोलिस स्टेशन अकोला येथे औषध निरीक्षक संजय राठोड यांनी गुन्हा नोंदविलेला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

तथापि, इंजेक्शन रेमडेसिविरचा काळाबाजार होऊ नये म्हणुन प्रत्येक किरकोळ विक्रेत्याने इंजेक्शन बाटलीवर रुग्णाचे नाव बिल क्रमांक नमुद करावा असे, आवाहन अन्न व औषध प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. उपचार करणारे डॉक्टरांनीही रुग्णास इंजेक्शन देण्यापुर्वी त्यावर रुग्णाचे नाव व बिल क्रमांक असल्याची खात्री करावी व रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजार रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सहायक आयुक्त(औषधे) वि. द. सुलोचने यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ