रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 1250 चाचण्यात 92 पॉझिटीव्ह

           अकोला,दि. 15(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.14) दिवसभरात झालेल्या 1250 चाचण्या झाल्या त्यात 92  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

  काल दिवसभरात बार्शीटाकळी येथे आठ चाचण्या झाल्या त्यात तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, पातूर येथे 36 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तेल्हारा येथे 49 चाचण्या झाल्या त्यात 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, मुर्तिजापूर येथे 14 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अकोला महानगरपालिकेतून 850  चाचण्या झाल्या त्यात 39 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोला आयएमए येथे 12 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 66 चाचण्या झाल्या त्यात 21  जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, हेगडेवार लॅब येथे 15 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर अकोला येथे 58, अकोट येथे 91, बाळापूर येथे 20 व जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे 31 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही,  असे  एकूण 1250 चाचण्यात 92 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 87 हजार 453 चाचण्या झाल्या पैकी 6614 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ