रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः २००० चाचण्यात ९१ पॉझिटीव्ह
अकोला,दि. ७ (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.६) दिवसभरात झालेल्या २००० चाचण्या झाल्या त्यात ९१ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात अकोला येथे २७५चाचण्या
झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अकोट येथे ९३ चाचण्या झाल्या
त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बाळापूर येथे ८२ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात
तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, बार्शीटाकळी येथे चार चाचण्या झाल्या
त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, पातूर
येथे ४० चाचण्या
झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तेल्हारा
येथे १३ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. मुर्तिजापूर येथे २३८ चाचण्या झाल्या
त्यात २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोला महानगरपालिकेमार्फत
११५५ चाचण्या झाल्या त्यात ३७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोला आय एम ए येथे चार
चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल
पॉझिटिव्ह आळा नाही. जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या २३ चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही
अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ७३ चाचण्या झाल्या त्यात २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, असे एकूण २००० चाचण्यात ९१ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात ७६
हजार ११४ चाचण्या झाल्या पैकी ५७६७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा