रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 802 चाचण्यात 114 पॉझिटीव्ह

 


 अकोला,दि. 24(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.23) दिवसभरात झालेल्या 802 चाचण्या झाल्या त्यात 114 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

  काल दिवसभरात अकोला येथे 14 चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. अकोट येथे 86 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  बार्शीटाकळी येथे 195 चाचण्या झाल्या त्यात नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. पातूर येथे 47 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तेल्हारा येथे 52 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. मुर्तिजापूर येथे 245 चाचण्या झाल्या त्यात 27 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे 18 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 85 चाचण्या झाल्या त्यात 40 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर हेडगेवार लॅब येथे 50 चाचण्या झाल्या त्यात 19 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर बाळापूर येथे नऊ, अकोला आयएमए येथे एकाची  चाचणी झाली त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 802 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 114 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात 101 हजार 958 चाचण्या झाल्या पैकी 8106 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ