1830 अहवाल प्राप्त, 325 पॉझिटीव्ह, 214 डिस्चार्ज, चार मृत्यू

 


अकोला,दि.14(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1830 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1504 अहवाल निगेटीव्ह तर 325 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 214  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर चार  जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

             त्याच प्रमाणे काल (दि.13) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 121 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 31840(25220+6443+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तर आज दिवसभरात आजचे एकुण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर(सकाळ)-245+आरटीपीसीआर (सायंकाळ)-80+रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट -121= 446, एकुण पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 176446 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 173752 फेरतपासणीचे 383 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2310 नमुने होते. आजपर्यंत एकूण 176181 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 150961 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

326 पॉझिटिव्ह

आज सकाळी २४५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ९३ महिला व १५२ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मुर्तिजापूर येथील १७, आलेगाव येथील १५, बोरगाव मंजू, कौलखेड, तेल्हारा व मोठी उमरी येथील प्रत्येकी ११, खडकी येथील नऊ, सिंधी कॅम्प येथील सात, पातूर व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी सहा, गिता नगर, डाबकी रोड व मलकापूर येथील प्रत्येकी पाच, आदर्श कॉलनी, बार्शीटाकळी, बाळापूर व जठारपेठ येथील प्रत्येकी चार, उमरी, दापूरा, राऊतवाडी, हरिहर पेठ, वाडेगाव, अमाखाँ प्लॉट, शिवाजी नगर व कोठारी वाटीका येथील प्रत्येकी तीन, वरखेड, कैलास टेकडी, मनब्दा, केशव नगर, तुकाराम चौक, खदान, जीएमसी, तोष्णीवाल लेआऊट,  पिंजर, अकोट, शिवसेना वसाहत, लहान उमरी, अंबिका नगर, वाशिम बायपास, रजपूतपुरा व अनिकट येथील  प्रत्येकी दोन, तर उर्वरित शेलद, पिंपरी, किर्ती नगर, शिवपूर, एनपी कॉलनी, गोळेगाव, पिंपळगाव काळे, हिवरखेड, खेल देशपांडे, वांगरगाव, बोचरा, बावने सोनोग्राफी क्लिनिक, तारफैल, अमृतवाडी, पंचशिल नगर, दुर्गा चौक, चांदुर, हिंगणा रोड, बालाजी नगर, गोकूल कॉलनी, गुडधी, निशांत टॉवर जवळ, न्यु भागवत प्लॉट, सिंध्दखेड, गड्डम प्लॉट, पैलपाडा, मोगाव, श्रावंगी प्लॉट, शास्त्रीनगर, दसरा नगर, जनेशहर रोड, लक्ष्मी नगर, बैदरखेड, कच्ची खोली, बाजार नगर, गायत्री नगर, कॉग्रेस नगर, गणेश कॉलनी, आळसी प्लॉट, देशमुख फैल, कृषी नगर, जूने शहर, भारती प्लॉट, दगडी पूल, बलवंत कॉलनी, गिरी नगर, मारोती नगर, पनज, न्यु तापडीया नगर, पातूर, उकडी बाजार, नकाक्षी व सुकडी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.  तसेच आज सायंकाळी ८० जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात ३३ महिला व ४७ पुरुषांचा समावेश आहे. त्यात अकोट येथील २९, पातूर येथील नऊ, खडकी व सिरसोली ता. तेल्हारा येथील प्रत्येकी सहा, पास्टूल ता.पातूर येथील पाच, देऊळगाव ता.पातूर येथील चार, कान्हेरी सरप, सहित, बार्शीटाकळी व महाण येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित लोहगड, पुनोती, साखरविरा, मालेगाव, दगडपारवा, आस्टूल, गुरुकुल कॉलनी, बाळापूर, सुरज नगर, आपातापा, वाशिम बायपास, गुडधी व बोरगाव मंजू येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे

दरम्यान काल (दि.13) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 121 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवालात करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

चार जणांचा मृत्यू

दरम्यान आज चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात  पंचशील नगर येथील ७२ वर्षीय महिला असून या महिलेस दि. ८ रोजी दाखल केले होते. तर अन्य बोरगाव मंजू येथील ६३ वर्षीय महिला असून या महिलेस दि. ८ रोजी दाखल केले होते, तर ७० वर्षीय दहिहांडा येथील पुरुष असून  या रुग्णास दि. १३ रोजी मृतावस्थेत दाखल केले होते. तसेच आज सायंकाळी खाजगी रुग्णालयातून एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण  तेल्हारा  येथील ७३ वर्षीय महिला असून त्यांना दि. ८ रोजी दाखल केले होते,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

214  जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १३, अकोला ॲक्सीडेंट येथील एक, आयकॉन हॉस्पीटल येथील सात, बिहाडे हॉस्पीटल येथील चार, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील एक,  कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथील तीन, कोविड केअर सेंटर अकोट येथील १६, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील तीन, हॉटेल स्कायलार्क येथील दोन,  ठाकरे हॉस्पीटल येथील एक, खैर उम्मीद हॉस्पीटल येथील चार, हॉटेल रिजेन्सी येथील सहा, ओझोन हॉस्पीटल येथील सहा, नवजीवन हॉस्पीटल येथील तीन, क्रिस्टले हॉस्पीटल येथील तीन, बाईज हॉस्टेल एक, आर्युवेदिक महाविद्यालय येथील चार, तर होम आयसोलेशन येथील १३६, असे एकूण २१४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

4001 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 31840(25220+6443+177) आहे. त्यात 532 मृत झाले आहेत. तर 27307 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 4001  जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ