१७८६अहवाल प्राप्त, १७१ पॉझिटीव्ह, २१९ डिस्चार्ज, तिघांचा मृत्यू

 अकोला,दि.९ (जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे १७८६ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १६१५ अहवाल निगेटीव्ह तर १७१  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान २१९  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर तीन  जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

             त्याच प्रमाणे काल (दि.८) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये १०१   जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या ३०१२८(२४०५०+५९०१+१७७) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तर आज दिवसभरात आजचे एकुण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर (सकाळ)-१२६+आरटीपीसीआर(सायंकाळ)-४५+ रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट-१०१= २७२ एकुण पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण १६८९०५ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे १६६२४३  फेरतपासणीचे ३८१ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २२८१ नमुने होते. आजपर्यंत एकूण १६८७८८ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १४४७३८ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

१७१ पॉझिटिव्ह

आज सकाळी १२६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ५२ महिला व ७४ पुरुष यांचा समावेश आहे. त्यात अकोट येथील १०, डाबकी रोड येथील आठ, जीएमसी येथील सहा, गोरक्षण रोड, तेल्हारा, मलकापूर, बाळापूर, तापडीया नगर प्रत्येकी चार, गितानगर, डीएचडब्ल्यू होस्टेल येथील प्रत्येकी तीन, पारस, नोव्हेल स्कूल, कोठारी कॉन्व्हेंट, अजगर हुसेन स्कूल, शिवाजी विद्यालय, पैलपाडा, जठारपेठ, बार्शी टाकळी, कौलखेड, मोठी उमरी, पोळा चौक, शास्त्री नगर, सिंधी कॅम्प, बाळापूर नाका, पिकेव्ही, गड्ड्म प्लॉट येथील प्रत्येकी दोन, उर्वरित नवसाळ, अंबुजा फॅक्टरी, आलंदा, गायगाव, शेरी, नेर, दानापूर, उबारखेड, राधाकिसन प्लॉट, रामदास पेठ, भिमन्गर, सुधीर कॉलनी, तुकाराम चौक, गिरी नगर, जुना तारफैल, सिद्धार्थ नगर, नेहरु पार्क, कलेक्टर ऑफीस, अशोक नगर, लहान उमरी, लंघापूर, हता, नया आंदुरा, दहिगाव, गजानन पेठ, हॉटल स्कायलार्क जवळ, गुडदी, भगिरथी नगर, आश्रय नगर, रेणूका नगर, भारत नगर, शाहू नगर, गुरुदत्त नगर,  सोनटक्के प्लॉट, मुर्तिजपूर, व्हीएचबी कॉलनी, लोहगड, गुप्ता ज्युस सेंटर, चोहोट्टा बाजार, खडकी, खरप रोड, चिवचिव बाजार, पंचशिल नगर आणि शिवनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर आज सायंकाळी ४५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १४ महिला व ३१ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. त्यात  मुर्तिजापूर येथील आठ, महागाव बु. येथील सहा, अकोट येथील चार, खदान, घुंगशी, हिंगणा फाटा आणि खंडाळा येथील प्रत्येकी दोन तर उर्वरीत कौलखेड, हिंगणा रोड, सिंधी कॅम्प, शास्त्री नगर, मोठी उमरी, पारड, जितापूर, कंजरा, वाडेगाव, पातूर, बार्शी टाकळी, जठारपेठ, लहान उमरी, वाघझरी, वस्तापूर, बालाजी नगर आणि चिखली येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान काल (दि.८) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात १०१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्याचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टिव्ह पॉझिटीव्ह संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

तिघांचा मृत्यू

आज तिघांचा मृत्यू झाला. त्यात सकाळी पोळा चौक, अकोला येथील ४४ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.८ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य एक  कौलखेड येथील ६६ वर्षील पुरुष रुग्ण असून या रुग्णास  दि.२ रोजी दाखल करण्यात आले होते. तर सायंकाळी खाजगी रुग्णालयात मोठी उमरी येथिल ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि.८ रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

२१९ जणांचा डिस्चार्ज

दरम्यान दुपारनंतर युनिक हॉस्पिटल येथून दोन, इंदिरा हॉस्पिटल येथून दोन, समाज कल्याण वसतीगृह येथून दोन, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथून आठ, नवजीवन हॉस्पिटल येथून पाच, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून तीन,  हॉटेल रिजेन्सी येथून पाच, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, आरकेटी आयुर्वेदिक कॉलेज येथून दोन, आयकॉन हॉस्पिटल येथून पाच, हॉटेल रिजेन्सी येथून पाच, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ३१ तर होम आयसोलेशन मधील १४७ असे एकूण २१९ जणांचा डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

३८२१ जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या ३०१२८(२४०५०+५९०१+१७७) आहे. त्यात ४९२ मृत झाले आहेत. तर २५८१५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३८२१ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ