रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः १६२० चाचण्यात २१० पॉझिटीव्ह

  अकोला,दि. १७(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.१६) दिवसभरात झालेल्या १६२० चाचण्या झाल्या त्यात २१०  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

  काल दिवसभरात अकोट येथे  ५५ चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. बाळापूर येथे  ७१ चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. बार्शीटाकळी येथे  दोन चाचण्या झाल्या त्यात एकही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. पातूर येथे १९ चाचण्या झाल्या त्यात  दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तेल्हारा येथे १४ चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. मुर्तिजापूर येथे  १०३ चाचण्या झाल्या त्यात १३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. अकोला मनपा तर्फे ११३८ चाचण्या झाल्या त्यात  ९८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. अकोला आयएमए तर्फे १८ चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या १९ चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ११५ चाचण्या झाल्या त्यात ५८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर हेडगेवार लॅब येथे ६६ चाचण्या झाल्या त्यात २७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. असे १६२० जणांच्या चाचण्या होऊन त्यात २१० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.आतापर्यंत जिल्ह्यात ९० हजार ६२० चाचण्या झाल्या पैकी ६९६८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

  1. लोकांनी तू तुझ्या घरी ,मी माझ्या घरी नाहीतर थेट देवाघरी . याकडे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे असून याचा अवलंब करावा. जिवापेक्षा मौल्यवान काहीच नाही.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ