रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 1277 चाचण्यात 105 पॉझिटीव्ह
अकोला,दि.
4(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन
टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.3) दिवसभरात झालेल्या 1277
चाचण्या झाल्या त्यात 105 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात अकोला येथे 64 चाचण्या झाल्या त्यात सात अहवाल पॉझिटिव्ह आला, अकोट
येथे 108 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला,
बार्शीटाकळी येथे 23 चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, पातूर येथे 108 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तेल्हारा येथे 32 चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, मुर्तिजापूर येथे 122 चाचण्या झाल्या त्यात 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोला महानगरपालिकेतून 684 चाचण्या झाल्या त्यात 35 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
आले, अकोला आयएमए येथे 38 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचे
अहवाल पॉझिटिव्ह आले, शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून 79 चाचण्या झाल्या त्यात 27 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
आले, तर जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे 19 चाचण्या झाल्या त्यात
कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे एकूण 1277 चाचण्यात 105 जणांचा
अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 70 हजार 406 चाचण्या झाल्या पैकी 5478 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा