रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः १३८७ चाचण्यात ११० पॉझिटीव्ह

 अकोला,दि. १०(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.९) दिवसभरात झालेल्या १३८७चाचण्या झाल्या त्यात ११०  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

          काल दिवसभरात अकोला येथे २६ चाचण्या झाल्या त्यात एक अहवाल पॉझिटिव्ह आला,   अकोट येथे ४० चाचण्या झाल्या त्यात एक अहवाल पॉझिटिव्ह आला, बाळापूर येथे १८६ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बार्शीटाकळी येथे सहा चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, पातूर येथे चार चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तेल्हारा येथे १२ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.  मुर्तिजापूर येथे १२५ चाचण्या झाल्या त्यात १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोला महानगरपालिकेमार्फत ८८५ चाचण्या झाल्या त्यात ६९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोला आय एम ए येथे नऊ चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या २८ चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ६६ चाचण्या झाल्या त्यात २०  जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले,  असे  एकूण १३८७ चाचण्यात ११० जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात ८१ हजार ५५१ चाचण्या झाल्या पैकी ६०९० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ