पालकमंत्री ना.बच्चु कडू यांचा जिल्हा दौरा

 


अकोला,दि.4 (जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे सोमवार दि. 5 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

सोमवार दि. 5 रोजी दुपारी 12. वा. 20 मि. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, दुपारी 12. वा. 55 मि. जिल्हाधिकारी कार्यालय, अकोलाकडे प्रयाण.  दुपारी 1 ते 1 वा. 55 मि. पर्यंत नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे कोरोना आढावा बैठक व  उपाययोजना, दुपारी 2 वा. पांदण रस्ते संदर्भात आढावा सभा, दुपारी 2 वा.35 मि. जिल्हा नियोजन समिती आढावा बैठक, व दुपारी 3 वा. 05 मि. दहावी व बारावीच्या परीक्षेची पुर्व तयारी बाबत आढावा बैठकीत उपस्थिती व सवडीने अमरावती कडे प्रयाण. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना