2228 अहवाल प्राप्त, 389 पॉझिटीव्ह, 775 डिस्चार्ज, दहा मृत्यू

 

अकोला,दि.25(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2228 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1839  अहवाल निगेटीव्ह तर 389 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 775 जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर दहा जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

  त्याच प्रमाणे काल (दि.24) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 80 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 37672(29388+8107+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज दिवभरात एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 389 व रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 80 असे एकूण पॉझिटीव्ह 469 आहेत.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 196789 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 193952 फेरतपासणीचे 385 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2452 नमुने होते. आजपर्यंत एकूण 196728 हवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 167340 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

389 पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात ३८९ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १५६ महिला व २३३ पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-

मुर्तिजापुर-३६, अकोट-४३, बाळापूर-आठ, बार्शी टाकळी- २५, पातूर-११, अकोला-२६६. (अकोला ग्रामीण-३४, अकोला मनपा क्षेत्र-२३२)

दरम्यान काल (दि. 24) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 80 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

दहा जणांचा मृत्यू

आज दिवसभरात १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात चैतन्य नगर, सिव्हील लाईन येथील ६० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य शिवाजी नगर येथील ५८ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २२ रोजी दाखल करण्यात आले होते, बार्शीटाकळी येथील ५९ वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. २४ रोजी दाखल करण्यात आले होते, डाबकी रोड येथील ८२ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते, तसेच वरखेड ता.बार्शीटाकळी येथील ६० वर्षीय महिला असून या महिलेस दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते, दहिहांडा ता.अकोट येथील ६३ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते. तर टाकळी बु.ता. अकोट  येथील ६५ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते. तर पातूर येथील ८० वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते. अन्वी मिर्झापूर येथील ४० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २१ रोजी दाखल करण्यात आले होते, ७० वर्षीय अज्ञात पुरुष रुग्णास दि. २४ रोजी मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

775 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३५, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील एक, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथील आठ, देवसार हॉस्पीटल येथील एक, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील आठ, मुलांचे वसतीगृह येथील ११, खैर उम्मत हॉस्पीटल येथील एक, यकीन हॉस्पीटल येथील एक, हॉटेल स्कायलार्क येथील एक, जिल्हा रुग्णालय अकोला येथील १६, आयकॉन हॉस्पीटल येथील तीन, ओझोन हॉस्पीटल येथील आठ, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, बिहाडे हॉस्पीटल येथील तीन, युनिक हॉस्पीटल येथील तीन, अवघाते हॉस्पीटल येथील एक, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील तीन हारमोनी हॉस्पीटल येथील दोन, ठाकरे हॉस्पीटल येथील दोन, अकोला ॲक्सिडेंट येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील ६६० असे एकूण ७७५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

5997  जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 37672(29388+8107+177) आहे. त्यात 629 मृत झाले आहेत. तर 31046 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 5997 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ