आणखी एका हॉस्पिटलचालकास दंड जिल्हाधिकारी पापळकर यांचे आदेश


अकोला,दि.२०(जिमाका)-  कोविड पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार करतांना अनियमितता व  शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन  न केल्याबद्दल  आणखी एका हॉस्पिटलचालकास ५० हजार रुपये दंड आकारण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

याबाबत आदेशात देण्यात आलेली माहिती अशी की, येथील ग्लोबल  हॉस्पिटल, माऊंट कारमेल शाळेजवळ, या ठिकाणी  कोविड रुग्णांवर होत असलेल्या उपचाराची जिल्हाधिकारी यांनी गठीत केलेल्या समितीने पाहणी व चौकशी केली. याठिकाणी अनियमितता दिसून आल्या, तसेच शासनाकडून वेळोवेळी निर्गमित सुचनांचे पालन न केल्याचे दिसुन आल्याचा अहवाल चौकशी समितीने दिला आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित हॉस्पिटलचालकास ५० हजार रुपये दंड आकारण्याचे आदेशीत केले आहे. तसेच  याबाबतची अनियमितता दिसून आल्यास रुग्णालयाचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ