२१५१ अहवाल प्राप्त, ४४६ पॉझिटीव्ह, ३९२ डिस्चार्ज, दहा मृत्यू

 अकोला,दि.१७(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे २१५१ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १७०५  अहवाल निगेटीव्ह तर ४४६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान ३९२  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर दहा जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

             त्याच प्रमाणे काल (दि.१६) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये २१०  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या ३३२७५(२६२०९+६८८९+१७७) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तर आज दिवसभरात आजचे एकुण पॉझिटीव्हः आरटीपीसीआर (सकाळ)३१९+आरटीपीसीआर (सायंकाळ)१२७+ रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट २१०=६५६  एकुण पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण १८०६७९  नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे १७७९५९ फेरतपासणीचे ३८३ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २३३७  नमुने होते. आजपर्यंत एकूण १८०४७९ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १५४२७० आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

४४६ पॉझिटिव्ह

 आज दिवसभरात ४४६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात आज सकाळी ३१९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ११५ महिला व २०४ पुरुषांचा समावेश आहे.  त्यात कौल खेड येथील २०, अकोट येथील १६, गोरक्षण रोड येथील १३,  मोठी उमरी येथिल १२,  मलकापूर येथील नऊ, बालापुर येथील आठ,  शिवर, मुर्तिजापूर येथील प्रत्येकी सात, आदर्श कॉलनी येथील सहा,  रणपिसेनगर,  व्हीएचबी कॉलनी,  सिंधी कॅम्प, डाबकी रोड,  येथील प्रत्येकी पाच, गितानगर, पातूर,  टाकळी बु.,  खडकी, राहेर, बेलखेड, जीएमसी येथील प्रत्येकी चार, तेल्हारा, सुधीर कॉलनी, हिंगणा रोड, खेतान नगर, लहान उमरी, जठारपेठ, देशमुख फाईल, लक्ष्मीनगर, पाटीलमंडळी, चोहोट्टा,  जांभा खु. येथील प्रत्येकी तीन,  व्याळा, रामनगर, गजानन नगर, गणेशनगर, अमानखा प्लॉट, टाकळी खु.,  शिवापूर, गावंडगाव, दहिगाव, तुकाराम चौक,  अंबिका नगर, जवाहर नगर, उगवा, जीएमसी गर्ल होस्टेल, तोष्णिवाल ले आऊट, पारस, रतनलाल प्लॉट, राऊतवाडी, तापडीयानगर, गड्डम प्लॉट येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित जयरामसिंग प्लॉट. गुरुदेव नगर, दसेरा नगर, पोळा चौक, बाभुळ अगाव,  डोंगरगाव,  गोकुळ कॉलनी,  माजलपुर दापुरा, बोरगाव मंजू, बोरगाव, भिमनगर,  आळशी प्लॉट, दुर्गा चौक,  नकाशी, जुना आरटीओ रस्ता,  पिंजर, राहित,  चांदूर,  गोपाळखेड,  मोरगाव भाकरे,  नविन आरटीओ, केडीया प्लॉट,  शास्त्री नगर,  सस्ति,  सांगवामेळ,  शिरताळा, मनब्दा,  सहकार नगर,  शिवसेना वसाहत,  शिवनगर, चिखली,  पाचपुळ,  मुळशी, विवरा, कृषीनगर,  दहिहांडा, शिवनी शिवर,  नायगाव, तालेगाव बाजार, करोडी, वरखेड,  खांडकेश्वर वेताळ., विझोरा, चांगेफळ, आगिखेड, शेकापूर, शिर्ला,  सिदाजीवेताळ,  उमरा, कोठारी,  जांब, टाकीया,  दानपूर, वरखेड, निंबोरा,  खेळ देशपांडे,  लोहारी,  लाडेगाव, पिंपरी खु., आंबोडा, आळेवाडी, शिवनापूर, कच्ची खोली, आरोग्य कॉलनी, राजीव गांधी नगर, दापोरा, गाडगेनगर, नेहरु पार्क,  गायत्री बालिकाश्रम,  दत्त कॉलनी,  सिद्धार्थ नगर, सोनाळा, कुंभारी, एमआयडीसी४,  कोणार, रामदास प्लॉट, धानेगाव, शेलाड, संभापूर,  कासारखेड, दिनोडा, ज्योती नगर,  मुंगशी, हातगाव, सुकळी, हरिहरपेठ, रिंगरोड, जुनेशहर, तारफाईल, पोलीस हेड क्वार्टर,  चिखलगाव,  बंजारा नगर,  कळंबेश्वर, अशोकनगर आणि संतोषनगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर आज सायंकाळी १२७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ५१ महिला व ७६ पुरुष आहेत. त्यात  जांभरुण येथील १९, मुर्तिजापूर येथील १२, वसाली पातूर येथील ११, खडकी येथील सात,सगड येथील सहा, दहातोंडा व सांगवी येथील प्रत्येकी चार,  शिरताळा, मराठा नगर, तुकाराम चौक, गोरक्षण रोड, पक्की खोली येथील प्रत्येकी तीन, बार्शी टाकळी, आदर्श कॉलनी, चांदूर, कच्ची खोली, गिरी नगर येथील प्रत्येकी दोन तर उर्वरीत  मनारखेड, पारस, समशेरपूर, चिखली कडवी, बोरगाव खु., हिरापूर, दाताळा, कोलंबी, धनज खु., करुम, कौठा सोपीनाथ,  भिमनगर, अन्वी मिर्जापूर,  धानोरा, आपातापा, वाशीम बायपास,  सांगवी मोहाडी,  वरखेड, सराळा, आलंदा, राजंदा, अजनी बु., दोनद,  पुनोती बु.,  गजानन नगर,  जीएमसी, उमरी,  कौलखेड,  न्यु तापडीया नगर,  आझाद कॉलनी,  वर्धमान नगर,  खदान, कृषी नगर,  शिवाजी नगर, गितानगर, महसूल कॉलनी, सिंधी कॅम्प,  न.प. कॉलनी,  पावसाळे ले आऊट येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान काल (दि.१६) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांच्या अहवालात २१० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णसंख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

दहा जणांचा मृत्यू

आज दहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात विजय नगर येथील ५१ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.१५ रोजी दाखल केले होते. पळसोबढे येथील ६८ वर्षीय महिला असून या महिलेस दि.१५ रोजी दाखल केले होते. चिवचिव बाजार येथील ६० वर्षीय महिला असुन या महिलेस  दि.८ रोजी दाखल केले होते.मुर्तिजापुर येथील ६१ वर्षीय महिला असून या महिलेस दि.११ रोजी दाखल केले होते, अन्य अकोला शहरातील ७० वर्षीय महिला असून या महिलेस दि.१६ रोजी दाखल केले होते. नगरपरिषद कॉलनी येथील ६० वर्षीय महिला असून  या महिलेस दि.१० रोजी दाखल केले होते. विवराचानी येथील २५ वर्षीय महिला असून या महिलेस दि.१६ रोजी दाखल केले होते. पारस येथील ४० वर्षीय महिला असून या महिलेस दि.१५ रोजी दाखल केले होते. नगरपरिषद कॉलनी येथील ६५ वर्षीय महिला असून या महिलेस दि.१५ रोजी दाखल केले होते, तर  शिवसेना वसाहत येथील ६२ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.१६ रोजी दाखल केले होते,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

३९२  जणांना डिस्चार्ज

आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५४, सामंत्र हॉस्पिटल येथून एक, आरकेटी महाविद्यालय येथून नऊ, इंदिरा हॉस्पिटल येथून दोन,  सहारा हॉस्पिटल येथून दोन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून तीन,  अकोला ॲक्सिडेंट हॉस्पिटल येथून एक, आयकॉन  नऊ, बार्शी टाकळी कोविड केअर सेंटर येथून  पाच,  सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून दोन, तेल्हारा कोविड केअर सेंटर येथून दोन, जिल्हा स्त्री रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथून पाच,  नवजीवन हॉस्पिटल येथून सात, बिहाडे हॉस्पिटल येथून पाच, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, समाज कल्याण मुलांचे वसतीगृह येथून चार,  अकोट कोविड केअर सेंटर येथून  चार, युनिक हॉस्पिटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून  चार तर देवसर हॉस्पिटल येथून तीन, होम आयसोलेशन मधील २६७ असे एकूण ३९२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

४३०९  जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या ३३२७५(२६२०९+६८८९+१७७) आहे. त्यात ५५५ मृत झाले आहेत. तर २८४११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४३०९ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ