पालकमंत्र्यांनी घेतला दहावी- बारावी परीक्षांच्या पूर्वतयारीचा आढावा

 कोला,दि. (जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज  जिल्ह्यात होणाऱ्या माध्यमिक शालांत( इयत्ता दहावी) व उच्च माध्यमिक शालांत (इयत्ता बारावी) परीक्षांच्या नियोजनाबाबत आढावा घेतला. कोविड संसर्गाच्या पार्श्वभुमिवर अधिक खबरदारी घेण्याचे निर्देश यावेळी ना. कडू यांनी दिले. या बैठकीस विधानपरिषद सदस्य आ. अमोल मिटकरी,  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटीयार,  मनपा आयुक्त निमा अरोरा,  अपर पोलीस अधीक्षक  मोनिका राऊत, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षार्थिंची संख्या त्यानुसार केंद्र संख्या. नियोजित केंद्रांवरील सर्व सज्जता याबाबत त्यांनी आढावा घेतला.  परीक्षा केंद्रांवर परीक्षेच्या कामासाठी नियुक्त परीक्षक, केंद्र प्रमुख व अन्य आवश्यक कर्मचारी यांच्या कोविड चाचण्या करुन घ्याव्या. परीक्षा केंद्राचे सॅनिटायझेशन करावे. विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी आवश्यक व्यवस्था उपलब्ध करावी. कोविड संसर्गाच्या पार्श्वभुमिवर परिक्षार्थी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत अधिक काळजी व खबरदारी घ्यावी,अशी सुचनाही ना. कडू यांनी केली. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना