रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 522 चाचण्यात 80 पॉझिटीव्ह

 

 अकोला,दि. 25(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.24) दिवसभरात झालेल्या 522 चाचण्या झाल्या त्यात 80 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

  काल दिवसभरात अकोट येथे 111 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  बार्शीटाकळी येथे 11 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. पातूर येथे सहा चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. मुर्तिजापूर येथे 129 चाचण्या झाल्या त्यात 16 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. अकोला आयएमए येथे 13 चाचण्या झाल्या त्यात चौघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,  जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे 23 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 73 चाचण्या झाल्या त्यात 25 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर हेडगेवार लॅब येथे 77 चाचण्या झाल्या त्यात 25 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर अकोला येथे पाच, बाळापूर येथे 15, तेल्हारा येथे 59  चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 522 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 80 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात 102 हजार 480 चाचण्या झाल्या पैकी 8186 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ