रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः २२६३ चाचण्यात ११२ पॉझिटीव्ह
अकोला,दि. ८ (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.७) दिवसभरात झालेल्या २२६३ चाचण्या झाल्या त्यात ११२ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात अकोला येथे ३३३
चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अकोट येथे ९६ चाचण्या
झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बाळापूर येथे १४५ जणांच्या चाचण्या
झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, बार्शीटाकळी येथे ८० चाचण्या झाल्या
त्यात तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, पातूर
येथे ८९ चाचण्या
झाल्या त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तेल्हारा
येथे ३० जणांच्या चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. मुर्तिजापूर येथे २०३ चाचण्या झाल्या
त्यात ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोला महानगरपालिकेमार्फत
११८६ चाचण्या झाल्या त्यात ६४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोला आय एम ए येथे सहा
चाचण्या झाल्या त्यात तिघांचा अहवाल
पॉझिटिव्ह आला. जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या ३० चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही
अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ६५ चाचण्या झाल्या त्यात १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, असे एकूण २२६३ चाचण्यात ११२ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात ७८
हजार ३७७ चाचण्या झाल्या पैकी ५८७९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा