मर्यादा तोडणाऱ्या मंगल कार्यालयांवर कडक कार्यवाही करणार; जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचा इशारा

 


अकोला,दि.29 (जिमाका)- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. लग्नप्रसंगाना अटीशर्तीसह 25 व्यक्तीची परवानगी देण्यात आली आहे. परंतु काही मंगल कार्यालयामध्ये नियमाची पालन होताना दिसून येत नाही. तसेच या ठिकाणी मर्यादापेक्षा जास्त प्रमाणात नागरिक एकत्र येवून गर्दी करत असल्याचे निर्देशान येत आहे. अशा मंगल कार्यालयांवर कार्यवाही करण्यात येत आहे. यापुढे अशा मर्यादा तोडणाऱ्या मंगल कार्यालयांच्या व्यवस्थापकावर कार्यवाही करुन मंगल कार्यालय सिल करण्यात येणार आहे. तसेच या मंगल कार्यालयाचे सर्व लग्न व इतर कार्यक्रम रद्द करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला.

लग्न व इतर सभारंभात  मोठ्या प्रमाणात गर्दी ही कोरोना संसर्गाला आमंत्रणच आहे. यासाठी मंगल कार्यालय व्यवस्थापनासह लग्न कार्यालयात येणाऱ्या वधू-वर पक्षाकडील  व्यक्तीनी कोरोना नियमाचे काटेकोरपणे पालन करुन लग्न सभारंभास 25 व्यक्तीच्या परवानगीपेक्षा जास्त संख्या होणार नाही याकडे विशेष लक्ष दयावे. अन्यथा प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या कडक दंडात्मक कार्यवाहीसह इतर कार्यवाहीला समोरे जावे लागेल यांची प्रत्येकानी दक्षता घ्यावी, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ