735 अहवाल प्राप्त, 105 पॉझिटीव्ह, 353 डिस्चार्ज, आठ मृत्यू

 अकोला,दि.12(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 735 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 630 अहवाल निगेटीव्ह तर 105 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 353  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर आठ  जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

             त्याच प्रमाणे काल (दि.11) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 94 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 31026(24664+6185+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तर आज दिवसभरात आजचे एकुण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर(सकाळ)-94+आरटीपीसीआर (सायंकाळ)-11+रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट -94= 199, एकुण पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 173238 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 170555  फेरतपासणीचे 383 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2300 नमुने होते. आजपर्यंत एकूण 173129 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 148465  आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

105 पॉझिटिव्ह

आज सकाळी ९४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ३४ महिला व ६० पुरुषांचा समावेश आहे. त्यातील कौलखेड येथील सात, खडकी येथील सहा, मोठी उमरी व पारस येथील प्रत्येकी पाच, कच्ची खोली येथील चार, मलकापूर, आदर्श कॉलनी व विवरा येथील प्रत्येकी तीन, रजपूतपुरा, सिव्हील लाईन, गौतम नगर, डाबकी रोड, मोठा राम मंदिर, आश्रय नगर, संताजी नगर, रमेश नगर, पक्की खोली व भंडारज बु. येथील  प्रत्येकी दोन, तर उर्वरित देशमुख पेठ, जूने आळसी बाजार, मेहबुबनगर, वारेगाव मंजू, टॉवर चौक, कृषी नगर, जूने शहर, रानी हेरिटेज, भगीरथ नगर, लहान उमरी, खोलेश्वर, जठारपेठ, दुर्गाचौक, सूधीर कॉलनी, बाळापूर रोड, भरतपूर ता.बाळापूर, मो.अली रोड, जैन मंदिर, देवी खदान, नागपूरी जिन, दामिनी हॉस्पीटल मागे, केशवनगर, हिरपूर ता.मुर्तिजापूर, मालीपूरा, अकोटफैल, रणपिसे नगर, बैलपाडा, रामनगर, भारती प्लॉट, हरिहर पेठ, लोकमान्य नगर, खदान, हिंगणा रोड, गोरक्षण रोड, तांडाली, महात्मा फुले, किर्ती नगर व बलवंत नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी ११ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात सहा महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. त्यात आलेगाव येथील दोन, तर उर्वरित मुंडलेश्वर, पातूर, खडकी, न्यु आळसी प्लॉट, निभांडेपोस्ट, राजपूत्रा, राजीव गांधी नगर, कावसा दहिहांडा व दगडीपारा ता.बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

दरम्यान काल (दि.11) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 94 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवालात करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

आठ जणांचा मृत्यू

दरम्यान आज आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात डाबकी रोड येथील ५० वर्षीय महिला असून या महिलेस दि. ९ रोजी दाखल केले होते. अन्य मुर्तिजापूर येथील ७० वर्षीय महिला असून या महिलेस दि.९ रोजी दाखल केले होते. तर ८२ वर्षीय गॅलेक्सी पार्क हिंगणा येथील पुरुष असून  या रुग्णास दि.११ रोजी दाखल केले होते. तर अन्य रुग्ण शिवणी येथील ९२ वर्षीय महिला असून या महिलेस दि. ११ रोजी दाखल केले होते. तसेच पंचशील नगर येथील ६५ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. ४ रोजी खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. तसेच आज सायंकाळी खाजगी रुग्णालयातून तिघांचा मृत्यू झाला. त्यात देशमुख फैल येथील ७१ वर्षीय पुरुष असून त्यांना दि. ५ रोजी दाखल केले होते. अन्य रणपिसे नगर येथील ८० वर्षीय पुरुष असून  या रुग्णास दि. ५ रोजी दाखल केले होते. तसेच खोलेश्वर रोड, अकोला येथील ९० वर्षीय महिला असून या महिलेस दि. १ रोजी दाखल केले होते,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

353  जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३१, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील एक, युनिक हॉस्पीटल येथील दोन, अकोला ॲक्सीडेंट येथील तीन, आयकॉन हॉस्पीटल येथील एक, हारमोनी हॉस्पीटल येथील एक, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथील दोन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील दोन, आधार हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील दोन, ओझोन हॉस्पीटल येथील चार, समाज कल्याण वसतीगृह येथील सात, आर्युवेदिक महाविद्यालय येथील आठ, इंदिरा हॉस्पीटल येथील दोन, बिहाडे हॉस्पीटल येथील पाच, हॉटेल रिजेन्सी येथील चार, तर होम आयसोलेशन येथील २७८, असे एकूण ३५३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

3747 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 31026(24664+6185+177) आहे. त्यात 516 मृत झाले आहेत. तर 26763 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 3747  जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ