1617 अहवाल प्राप्त, 334 पॉझिटीव्ह, 752 डिस्चार्ज, 10 मृत्यू

 


अकोला,दि.27(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1617 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1283  अहवाल निगेटीव्ह तर 334 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 752 जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर 10 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

  त्याच प्रमाणे काल (दि.26) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 166 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 38543(29986+8380+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज दिवभरात एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 334 व रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 166 असे एकूण पॉझिटीव्ह 500 आहेत.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 199918 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 197062 फेरतपासणीचे 387 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2469 नमुने होते. आजपर्यंत एकूण 199748 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 169762 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

334 पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात ३३४ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १३४ महिला व २०० पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-

मुर्तिजापुर-३२, अकोट-५४, बाळापूर-२१, तेल्हारा-तीन, बार्शी टाकळी-सहा, पातूर-चार, अकोला-२१४. (अकोला ग्रामीण-२५, अकोला मनपा क्षेत्र-१८९)

दरम्यान काल (दि. 26) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 166 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

10 जणांचा मृत्यू

आज दिवसभरात १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात पारस येथील ५१ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २५ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य विझोरा ता. बार्शीटाकळी येथील ४० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते, गिरी नगर येथील ५८ वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि. २५ रोजी दाखल करण्यात आले होते, मलकापूर येथील ६७ वर्षीय पुरुष असून या पुरुष दि. २४ रोजी दाखल करण्यात आले होते. बाळापूर येथील ४४ वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि. २५ रोजी दाखल करण्यात आले होते, वाशिम बायपास येथील ४५ वर्षीय  पुरुष असून या रुग्णास दि. १६ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच अकोट फैल येथील ६१ वर्षीय पुरुष रुग्णास दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते, व्याळा ता. बाळापूर येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णास दि. २४ रोजी दाखल करण्यात आले होते, हनुमान बस्ती येथील ६३ वर्षीय पुरुष रुग्णास दि. २१ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच एकाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. हा रुग्ण पातूर येथील ४० वर्षीय पुरुष असून त्याना दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

 752 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३९, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील १०, बिहाडे हॉस्पीटल येथील चार, केअर हॉस्पीटल येथील एक, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथील दोन, यकीन हॉस्पीटल येथील तीन, बबन हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील एक, खैर उम्मत हॉस्पीटल येथील एक, मुलांचे वसतीगृह येथील १९, कोविड केअर सेंटर अकोट येथील २२, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, सहारा हॉस्पीटल येथील एक, इंदिरा हॉस्पीटल येथील दोन, देशमुख हॉस्पीटल येथील एक, ओझोन हॉस्पीटल येथील एक, पाटील हॉस्पीटल येथील एक, अर्थव हॉस्पीटल येथील एक, अवघाते हॉस्पीटल येथील तीन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील तीन, हार्मोनी हॉस्पीटल येथील एक, अकोला ॲक्सीडेंट येथील एक, तर होम आयसोलेशन मधील ६३० असे एकूण ७५२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

5353 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 38543(29986+8380+177) आहे. त्यात 655 मृत झाले आहेत. तर 32535 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 5353 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ