2397 अहवाल प्राप्त, 546 पॉझिटीव्ह, 127 डिस्चार्ज, 10 मृत्यू


अकोला,दि.22(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2397 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1851  अहवाल निगेटीव्ह तर 546 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 127 जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर 10 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

  त्याच प्रमाणे काल (दि.22) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 162 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 36145(28236+7732+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज दिवभरात एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 546 व रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 162 असे एकूण पॉझिटीव्ह 708 आहेत.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 190355  नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 187556 फेरतपासणीचे 385 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2414   नमुने होते. आजपर्यंत एकूण 190184 हवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 161948 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

546 पॉझिटिव्ह

 आज  दिवसभरात ५४६ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २११ महिला व ३३५ पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-

मुर्तिजापुर-७९, अकोट-१४, बाळापूर-सात, तेल्हारा-१४, बार्शी टाकळी-८३, पातूर-९७, अकोला-२५२. (अकोला ग्रामीण-५४, अकोला मनपा क्षेत्र-१९८)

दरम्यान काल (दि. 21) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात  162 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

10 जणांचा मृत्यू

आज दिवसभरात दहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात डोंगरगीरी येथील ५५ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य आझाद कॉलनी येथील ७६ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २१ रोजी दाखल करण्यात आले होते, पत्रकार कॉलनी येथील ५० वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि. २१ रोजी दाखल करण्यात आले होते, म्हाडा कॉलनी, कौलखेड येथील ६० वर्षीय महिला असून या महिलेस दि. २१ रोजी दाखल करण्यात आले होते, तर तिवसा येथील ४२ वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते, चवरे प्लॉट येथील ३१ वर्षीय  पुरुष असून या रुग्णास दि.११ रोजी दाखल करण्यात आले होते.  वाशिम बायपास येथील ७० पुरुष रुग्णास दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते, गायत्री नगर मोठी उमरी येथील ५५ वर्षीय पुरुष रुग्णास दि.१९ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच खाजगी रुग्णालयातील दोघांचे मृत्यू झाले. त्यात शिलोडा येथील ७० वर्षीय पुरुष रुग्णास दि.२१ रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य श्रावगी  प्लॉट येथील ७३ वर्षीय महिला रुग्णास दि.२१ रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

127  जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ११, इंदिरा हॉस्पीटल येथून एक, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून दोन, बिहाडे हॉस्पीटल येथून ११, अवघाते हॉस्पीटल येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील चार, कोविड केअर सेंटर अकोट येथील तीन, अकोला ॲक्सीडेंट येथील पाच, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालयातून १३, देवसार हॉस्पीटल येथील तीन, युनिक हॉस्पीटल येथील तीन, मुलाचे वसतीगृह येथील २०, हारमोनी हॉस्पीटल येथील एक, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, नवजीवन हॉस्पीटल येथील तीनतर होम आयसोलेशन मधील ४२ असे एकूण १२७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

6170  जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 36145(28236+7732+177)  आहे. त्यात 602 मृत झाले आहेत. तर 29373 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 6170 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ