लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था: मे महिन्यासाठी जीवनावश्यक वस्तू वाटप परिमाणे निश्चित

 अकोला,दि. ९ (जिमाका)- लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत  अन्न धान्य, नियंत्रित साखर इ. जीवनावश्यक वस्तूंचे अकोला जिल्ह्यात करावयाचे वाटप परिमाण मे महिन्यासाठी निश्चित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु. काळे यांनी  दिली आहे.

वाटप परिमाण या प्रमाणे-

प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी गहू (तीन किलो प्रति व्यक्ती) दर- दोन रुपये प्रति किलो.

प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी तांदूळ (दोन किलो प्रति व्यक्ती) दर- तीन रुपये प्रति किलो.

अंत्योदय योजना गहू (१५किलो प्रति कार्ड) दर- दोन रुपये प्रति किलो.

अंत्योदय योजना तांदूळ (२०किलो प्रति व्यक्ती) दर- तीन रुपये प्रति किलो.

एपीएल शेतकरी कुटुंब लाभार्थ्यांसाठी गहू(चार किलो प्रति व्यक्ती) दर- दोन रुपये प्रति किलो.

एपीएल शेतकरी कुटुंब लाभार्थ्यांसाठी तांदूळ(एक किलो प्रति व्यक्ती) दर- तीन रुपये प्रति किलो.

नियंत्रित साखर अंत्योदय लाभार्थ्यांकरीता(एक किलो प्रति कार्ड) दर- २० रुपये प्रति किलो.

ही वाटप परिमाणे गोदामातील साठ्याच्या व लाभार्थी संख्येच्या उपलब्धतेनुसार राहतील,असेही जिल्हा पुरवठा अधिकारी काळे यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ