'ब्रेक द चेन' अंतर्गत दि. 22 एप्रिलच्या रात्री 8 वाजेपासून पासून लागू होणारी सुधारित नियमावली


           

            अकोला,दि. २२(जिमाका)-  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता व संसर्गाची साखळी तोडण्याच्यादृष्टीने २२ एप्रिल २०२१ च्या रात्री ८ वाजल्यापासून ते दि.१ मे २०२१ च्या सकाळी ७ वाजेपर्यंत ‘ब्रेक द चेन’  अंतर्गत मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी  आदेश निर्गमित केले.  

अ)   कार्यालयीन उपस्थिती

1)     सर्व शासकीय कार्यालये (राज्य, केन्‍द्र तसेच स्थानिक प्राधिकरण  अंतर्गत) कोविड-19 साथीचा रोग व व्यवस्थापनाशी थेट जोडलेल्या आपत्कालीन सेवा वगळता केवळ 15 टक्के उपस्थितीसह सुरु राहतील.

2)     इतर शासकीय  कार्यालयामधील  उपस्थितीबाबत कार्यालय प्रमुख यांनी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचेकडून रितसर परवानगी घेवून अधिक उपस्थिती क्षमतेने सुरु ठेवता येतील.

3)     केंद्रीय, राज्य तथा स्थानिक शासकीय कार्यालय, त्यांचे प्राधिकरण आणि संघटन सहकारी, सार्वजनिक युनिट आणि खाजगी बँक, आवश्यक सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांचे कार्यालय, विमा मेडिक्लेम कंपन्या उत्पादन वितरण व्यवस्थेमध्ये असणारे, औषधी कंपन्यांचे कार्यालय, सर्व गैर-बँकिंग वित्तीय महामंडळ, सर्व सूक्ष्म वित्तीय संस्था, वकिलांचे कार्यालय. या सर्वांनी कमीत कमी कर्मचाऱ्यांसोबत काम करावे आणि एका वेळेला कार्यालयात क्षमतेच्या 50 टक्‍के. 

4)   इतर सर्व कार्यालयांसाठी त्यांच्या एकूण उपस्थितीच्या किंवा  15 टक्के या पैकी जी जास्त असेल ती.

5)    अत्यावश्यक सेवांसाठी आवश्यक असलेल्या सर्व कार्यालयीन कामांसाठी  कमीत कमी 50 टक्के अथवा आवश्‍यकता भासल्‍यास  100 टक्के पर्यंत वाढविता येवू शकेल.

ब)    लग्‍न समारंभ

               विवाहसोहळा फक्त एकाच सभागृहात 25 व्‍यक्‍तींच्‍या उपस्थितीत आयोजित करता येईल. ज्यात 2 तासांपेक्षा जास्त वेळ  राहणार नाही.  लग्‍नसमारंभाचे आयोजन केलेल्‍या  व्‍यक्‍तीने  (कुटूंबाने ) नियमांचे पालन न केल्‍यास त्यांना 50 हजार रुपये आणि ज्‍या ठिकाणी  कार्यक्रम आयोजित करण्‍यात आलेला आहे. त्‍या  जागेच्‍या  मालकाकडून गैरवापर केला गेला आहे,  असे गृहीत धरुन कोविड साथीचा रोग संपृष्‍ठात येईपर्यंत  संबंधीत जागा बंद ठेवण्‍याबाबत कार्यवाही करण्‍यात येईल. ( सदरची कार्यवाही पोलीस विभाग ,महानगर पालिका क्षेत्रात आयुक्‍त, मनपा तसेच इतर ठिकाणी नगर परिषद, नगर पंचायत करावी. )

क)   खाजगी प्रवासी वाहतूक

1)     खासगी प्रवासी वाहतूक ( महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन सेवेची बस वगळता)केवळ आपत्कालीन किंवा आवश्यक सेवांसाठी ड्रायव्हरसह एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के वैध कारणांसाठी चालवू शकेल. हे आंतर जिल्हा किंवा आंतर शहर येथील प्रवाशांच्या निवासस्थानापुरतेच मर्यादित राहील. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत किंवा अंत्यसंस्कारा सारख्या अनिवार्य घटनांमध्ये किंवा कुटूंबाच्या गंभीर आजराकरिता जाण्‍यासाठी  आवश्यक असल्यास आंतरजिल्हा किंवा आंतर शहर प्रवासास परवानगी राहील. सदर नियमांचे उल्‍लंघन करणाऱ्याकडून 10 हजार रुपये दंड आकारण्‍यात येईल.  ( सदरची कार्यवाही पोलीस विभाग, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेमार्फत करण्‍यात येईल.)

2)     खाजगी बसेस यांना एकूण  आसन क्षमतेच्‍या 50 टक्के क्षमतेपेक्षा जास्‍त प्रवासी वाहतूक करता येणार नाही. तसेच प्रवासी यांना उभ्‍याने  प्रवास करता येणार नाही.

3)     खाजगी बसेसद्वारे आंतर शहर किंवा आंतर जिल्हा प्रवासाकरिता  खालील प्रमाणे निर्बंध राहतील. 

i.                    खाजगी बस चालकांना शहरामध्‍ये जास्‍तीत जास्‍त दोन  थांबे मर्यादीत राहतील. तसेच  या बाबत स्‍थानिक आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण यांना बसेसच्‍या वेळापत्रकाबाबत माहिती देणे  बंधनकारक राहील. बसेसचे प्रवास बदलण्‍याचे अधिकार स्‍थानिक प्राधिकरणास राहतील.

ii.                 ज्या स्थानकांवर प्रवाशांना सोडण्‍यात येईल त्या ठिकाणी 14 दिवसांकरिता घरामध्‍ये विलगीकररणामध्‍ये  राहणे अनिवार्य राहील.  तसेच  त्‍यांचे  हातावर शिक्‍के मारण्‍यात येईल.   (सदरची कार्यवाही पोलीस विभाग, महानगर पालिका क्षेत्रात आयुक्‍त, मनपा तसेच इतर ठिकाणी नगर परिषद, नगर पंचायत यांनी करावी. )

iii.               खाजगी बसेसमध्‍ये  थर्मल स्कॅनरचा  वापर करण्‍यात यावा.  तसेच  कोविड-19 ची लक्षणे असलेल्या प्रवाशाला निकटच्‍या  कोविड केअर सेंटर किंवा रुग्णालयात हलविण्‍यात यावे.

iv.                स्‍थानिक प्राधिकरण व आरोग्‍य विभाग यांनी थांब्‍याचे  ठिकाणी  प्रवाशांची  रॅपीड अॅन्‍टीजन्‍स टेस्‍ट करण्‍याकरिता आवश्‍यक पथकाचे  गठन करावे.  तसेच  टेस्‍ट करण्‍याकरिता लागणारा खर्च प्रवासी अथवा वाहन मालाकडून घेण्‍यात यावा. 

v.                  कोणत्‍याही प्रवासी वाहनाचे  चालक / मालक यांनी  या मार्गदर्शक तत्त्वांचा भंग केल्‍याचे  आढळून आल्‍यास त्‍यांचेकडून 10 हजार रुपये दंड आकारण्‍यात येईल.  कोविड हा साथीचा रोग संपूष्‍टात येईपर्यंत संबंधीतांचे लायसन्‍स रद्द करण्‍यात येईल.

ड)    सार्वजनिक प्रवासी वाहतूक

a)      फक्त खालील श्रेणीतील व्‍यक्‍तींना स्थानिक गाड्या, मेट्रो आणि मोनो रेल सेवा (लांब पल्ल्याच्या गाड्या वगळता) वापरण्याची परवानगी असेल.

·         सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचारी ( राज्‍य, केन्‍द्र, स्‍थानिक प्राधिकरण)  यांना त्‍यांचे  कार्यालयाने  वितरीत केलेल्‍या ओळखपत्राचे  आधारे.

·         सर्व वैद्यकीय कर्मचारी (डॉक्टर / पॅरामेडीकल्‍स / लॅब तंत्रज्ञ / रुग्णालय व वैद्यकीय क्लिनिक कर्मचारी इत्यादी) संबंधित वैद्यकीय प्राधिकरण यांनी दिलेल्या ओळखपत्राच्या आधारे.

·         वैद्यकीय उपचार घेणारी कोणतीही व्यक्ती किंवा विशेषत: अपंग व्यक्ती आणि गरजू व्यक्तीसमवेत एक व्यक्ती.

b)     राज्य सरकार किंवा स्थानिक प्राधिकरणाच्‍या मालकीच्या सार्वजनिक बसेस एकूण  आसण क्षमतेच्‍या 50 टक्के ( कोणत्‍याही प्रवाशाला उभ्‍याने प्रवास करता येणार नाही.  )

c)      लांब पल्ल्याच्या गाड्यांद्वारे आणि बसेसद्वारे अंतर शहर किंवा अंतर जिल्हा प्रवास करण्‍याकरिता खालील प्रमाणे निर्बंध राहतील.

i.                    स्थानिक रेल्वे प्रशासनमहाराष्‍ट्र राज्‍य परिवहन महामंडळ  यांनी प्रवास करणा-या व्‍यक्‍तींचे  कोविड-19 संबंधाने सर्व माहिती स्‍थानिक प्राधिकरणास कळविणे  गरजेचे राहील.  

ii.                 ज्या ठिकाणी थांबा असेल त्‍या ठिकाणच्‍या  प्रवाशांना 14 दिवसाकरिता गृह अलगीकरणाबाबतचे   शिक्‍के हातावर मारण्‍यात यावे. त्‍याच प्रमाणे वाहनामध्‍ये थर्मल स्‍कॅनिंगची व्‍यवस्‍था करण्‍यात यावी.   आणि लक्षणे असलेल्या प्रवाशालानिकटच्‍या कोविड केअर सेंटरकिंवा रुग्णालयात भरतीकरण्‍यात यावे.

iii.               स्‍थानिक प्राधिकरण व आरोग्‍य विभाग यांनी थांब्‍याचे  ठिकाणी  प्रवाशांची  रॅपीड अॅन्‍टीजन्‍स टेस्‍ट करण्‍याकरिता आवश्‍यक  पथकाचे  गठन करावे.  तसेच  टेस्‍ट करण्‍याकरिता लागणारा खर्च प्रवासी  यांचेकडून घेण्‍यात यावा.

iv.                पेट्रोलपंप खाजगी वाहनांकरिता ( पेट्रोल , डीझेल, सीएनजी, एलपीजी ) विक्री सकाळी  सात ते 11 वाजेपर्यंत.

v.                  पेट्रोलपंप शासकीय, मालवाहतूक, अॅम्‍ब्‍युलंन्‍स इ. अत्‍यावश्‍यक वाहनांकरिता( पेट्रोल , डीझेल, सीएनजी, एलपीजी ) विक्री नियमित वेळेनुसार.

vi.                राष्‍ट्रीय व राज्‍यमहामार्गावरील महानगरपालिका हद्दीबाहेरील तसेच नगर परिषद हद्दीबाहेरील व गावाच्‍या सिमेचे कक्षात न येणारे पेट्रोलपंप( पेट्रोल , डीझेल, सीएनजी, एलपीजी ) नियमित वेळेनुसार .

vii.              कोविड-19 चे अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्‍या आदेशातील निर्बंध  लागू राहतील.

                         

            आदेशातील सूचनांचे सर्व नागरिकांनी पालन करावे. तसेच आदेशाची अंमलबजावणी जिल्‍हा पोलीस अधीक्षक अकोला, मनपाचे आयुक्‍त, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी न.प-न.पं. तसेच सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी करावी, असे आदेशात नमूद केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ