नितीनकुमार डोंगरे यांचा सेवानिवृत्ती समारंभ; जिल्हा प्रशासनाच्या प्रतिमा संवर्धनात डोंगरे यांचे मौलाचे योगदान
अकोला,दि. 30
(जिमाका)- जिल्हा माहिती कार्यालयाचे श्री. नितीनकुमार डोंगरे यांनी सेवाकालावधीमध्ये प्रसिद्धी विषयक कामकाजामुळे
जिल्हा प्रशासनाच्या प्रतिमा संवर्धनात मौलाचे योगदान दिले असल्याचे सांगून जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर यांनी त्यांना भावी आयुष्याकरीता शुभेच्छा दिल्या. श्री. डोंगरे यांना आज नियत
वयोमानानुसार सेवानिवृत्ती निमित्त निरोप देण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सेवानिवृत्ती
समारंभ कार्यक्रमात बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी
सदाशिव शेलार, गाडवे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, पत्रकार संघाचे अध्यक्ष
सिध्दार्थ शर्मा, श्रमीक पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय डांगे आदि पत्रकार उपस्थित
होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा