मुर्तिजापुर येथे पोलीस पाटील यांचे प्रशिक्षण
अकोला,दि. ८ (जिमाका)- राज्य बाल संरक्षण संस्था, पुणे यांच्या निर्देशानुसार मुर्तिजापुर तालुक्यातील महसुली गावांमध्ये ग्राम बाल संरक्षण समिती गठित करण्यात आल्या आहेत. या समिती मधील सदस्य पोलीस पाटील यांचे प्रशिक्षण नुकतेच (१६ मार्च)घेण्यात आले. कोविड १९ च्या पार्श्वभुमिवर सर्व निर्बंधांचे पालन करीत मुर्तिजापुर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ३६ गावातील पोलीस पाटील या प्रशिक्षणात सहभागी झाले होते. यावेळी मुर्तिजापुर येथील गट विकास अधिकारी बायस, सहाय्यक प्रशासन अधिकारी अभिजीत बन्नोरे उपस्थित होते. यावेळी बाल संरक्षण समितीची भूमिका व कार्य, बालविवाह, बालकामगार, लैंगिक अपराधांपासुन बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२, या विषयांवर जिल्हा बाल संरक्षण कक्ष, अकोलाच्या ॲड. संगीता कोंडाणे, विधी तथा परिविक्षा अधिकारी, सुनिल सरकटे, संरक्षण अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. संचालन, प्रास्ताविक तथा आभार प्रदर्शन जिल्हा बाल संरक्षण कक्ष, अकोला समुपदेशक सचिन घाटे यांनी केले.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा