१३५५ अहवाल प्राप्त, ३०४ पॉझिटीव्ह, ४५५ डिस्चार्ज, सहा मृत्यू

 अकोला,दि.१६(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे १३५५ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १०५१  अहवाल निगेटीव्ह तर ३०४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान ४५५  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर सहा जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

             त्याच प्रमाणे काल (दि.१५) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये १४४  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या ३२६१९(२५७६३+६६७९+१७७) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तर आज दिवसभरात आजचे एकुण पॉझिटीव्हः आरटीपीसीआर (सकाळ) २३१+ आरटीपीसीआर (सायंकाळ) ७३+ रॅपिड ॲन्टिजेन १४४= ४४८  एकुण पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण १७८३९४ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे १७५६८९ फेरतपासणीचे ३८३ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २३२२  नमुने होते. आजपर्यंत एकूण १७८३२८ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १५२५६५ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

३०४ पॉझिटिव्ह

आज सकाळी २३१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ९२ महिला व १३९  पुरुषांचा समावेश आहे. त्यात मोठी उमरी येथील १६, पारस आणि डाबकी रोड येथील प्रत्येकी १०, कौलखेड, खडकी, गोरक्षण रोड, भरतपूर येथील प्रत्येकी सात, मलकापूर, जीएमसी येथील प्रत्येकी सहा,  जुने शहर पाच, जुने आरटीओ ऑफिस चार, बार्शी टाकळी, व्हीएचबी कॉलनी, कीर्तीनगर, कळंबा बु., राऊतवाडी, जठारपेठ, तापडीया नगर, सालतवाडा, रामनगर, राहेर, तुकाराम चौक येथील प्रत्येकी तीन,  आदर्श कॉलनी, गुडधी, पिंपळेनगर, बाळापूर, कोठारीवाटिका, तोष्णिवाल ले आऊट, कृषी नगर, शास्त्री नगर, मुर्तिजापूर, सिंधी कॅम्प, मासा,  तांदळी, महाकाली नगर, वानखडे नगर, अकोट,  गितानगर, कलेक्टर कॉलनी येथील प्रत्येकी दोन तर उर्वरीत  जांभळून, मिर्जापूर, आझाद कॉलनी,  लक्ष्मी नगर,बंजारा नगर, पक्की खोली, गायगाव, गौतमनगर, द्वारकानगरी, राधाकिसन प्लॉट, डोंगरगाव, रामनगर,  घुसर, खेतान नगर, बोरगाव मंजू, कान्हेरी गवळी, आंबोरा, शिवनी, खिरपुरी, कोळासा, अडोळ बु., जवाहनगर, वृंदावन नगर, विजोरा, दुर्गाचौक, गोकुळपेठ, हातगाव, ज्योतीनगर, इंदिरानगर, सिटी कोतवाली, कान्हेरी सरप, शिवसेना वसाहत, आळशी प्लॉट, कुंभारी, निंभोरा, पत्रकार कॉलनी, शिवाजी नगर, विजय नगर, केशव नगर, गजानन नगर, वाशींबा, हरिहरपेठ, किल्ला चौक, कार्ला, हाता, चांदूर, बाजोरियानगर, मानकी, उगवा, सावंतवाडी, कपिलवस्तू नगर, नायगाव, राधाकिसन प्लॉट, महसूल कॉलनी, म्हैसांग, रिधोरा, छोटी उमरी, पिंपळखुटा, पातूर, घनेगाव, वरुड, देवळी, बोथडी, ताथोड नगर, विजय नगर,  वस्तापूर, पळसोबढे, शिवाजी पार्क, आडगाव, लाहोरी, बळवंत कॉलनी, कापशी, पार्वती नगर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत. आज सायंकाळी ७३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ३० महिला व ४३ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. त्यात  पिंजर येथील सात, अकोट येथील पाच, मुर्तिजापुर, मलकापूर येथील प्रत्येकी चार, बार्शीटाकळी येथील तीन,  हरिहर पेठ, कामा प्लॉट, राधाकिसन प्लॉट. पातूर, राहि, मोठी उमरी,  कौलखेड, चोहोगाव, लोहगड, शास्त्री नगर येथील प्रत्येकी दोन तर उर्वरीत लहरिया नगर, भागवत प्लॉट, अमानखा प्लॉट, कोळंबी, सांगवा मेळ, माना, कलेक्टर कॉलनी, नित्यानंद नगर, मोठी उमरी, कपिलेश्वर, हिंगणा रोड, राधेय अपार्टमेंट, संतोष नगर, कातखेड, वरुर जवुळका, बालाजी नगर, व्याळा,  गिरीनगर, सोनटक्के प्लॉट, चिखलगाव, गोरक्षण रोड, जठारपेठ, महात्मा फुले नगर, विझोरा, आळंदा, खडकी, दहिहांडा, राजंदा, मजलापुर, जीएमसी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान काल (दि.१५) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांच्या अहवालात १४४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णसंख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

सहा जणांचा मृत्यू

आज सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात महसूल कॉलनी येथील ६० वर्षीय महिला असून या महिलेस दि.१३ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य एक अकोट फाईल येथील  ५८ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.१५ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच सराळा ता. बार्शी टाकळी येथील  ५५ वर्षीय महिला असून या महिलेस दि.८ रोजी दाखल करण्यात आले होते.  तर वाशीम बायपास येथील ९० वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.१५ रोजी दाखल करण्यात आले होते. या व्यतिरिक्त एक अनोळखी ४५ वर्षीय पुरुष रुग्णाचाही मृत्यू झाला आहे. या रुग्णास दि.१५ रोजी मृतावस्थेतच दाखल करण्यात आले होते. तर सायंकाळी खाजगी रुग्णालयात वाडेगाव ता. बाळापूर येथील ७२ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि.१० रोजी दाखल केले होते,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

४५५  जणांना डिस्चार्ज

आज दुपारनंतर उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापुर येथून तीन, ॲक्सिडेंट हॉस्पिटल येथून सहा, हार्मोनी हॉस्पिटल येथून एक, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून चार, युनिक हॉस्पिटल येथून दोन, आरकेटी महाविद्यालय  येथून १४,  हॉटेल रिजेन्सी येथून पाच,  समाजकल्याण मुलांचे वसतीगृह येथून सहा,  आयकॉन हॉस्पिटल येथून तीन,  नवजीवन हॉस्पिटल येथून चार, उम्मत मोहम्मद हॉस्पिटल येथून पाच, अवघाते हॉस्पिटल येथून सातम बिहाडे हॉस्पिटल येथून सात, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १८, कोविड केअर सेंटर मुर्तिजापुर येथून २४, कोविड केअर सेंटर अकोट येथून दोन,कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथून एक, तसेच होम आयसोलेशन मधील ३४० असे एकुण ४५५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

४०५५  जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या ३२६१९(२५७६३+६६७९+१७७) आहे. त्यात ५४५ मृत झाले आहेत. तर २८०१९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४०५५ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ