2553 अहवाल प्राप्त, 504 पॉझिटीव्ह, 438 डिस्चार्ज, 10 मृत्यू

 


अकोला,दि.29(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2553 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 2049  अहवाल निगेटीव्ह तर 504 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 438 जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर 10 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

  त्याच प्रमाणे काल (दि.28) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 168 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 39623(30759+8687+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज दिवभरात एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 504 व रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 168 असे एकूण पॉझिटीव्ह 672 आहेत.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 204460 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 201589 फेरतपासणीचे 387 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2484 नमुने होते. आजपर्यंत एकूण 204308 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 173549 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

504 पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात 504 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 208 महिला व 296 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-

मुर्तिजापुर-78, अकोट-67, बाळापूर-25, तेल्हारा-37, बार्शी टाकळी-20 पातूर-33, अकोला-244. (अकोला ग्रामीण-28, अकोला मनपा क्षेत्र-216)

दरम्यान काल (दि. 28) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 168 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

10 जणांचा मृत्यू

आज दिवसभरात 10 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात अक्कलकोट भोईपूरा येथील 76 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 26 रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य कैलास नगर येथील 55 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 24 रोजी दाखल करण्यात आले होते, जनूना ता. बार्शीटाकळी येथील 55 वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. 26 रोजी दाखल करण्यात आले होते, मोठी उमरी ताथोड नगर येथील 68 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 27 रोजी दाखल करण्यात आले होते. मोठी उमरी  येथील 42 वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. 27 रोजी दाखल करण्यात आले होते,अकोट येथील 72 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 26 रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच पारस ता. बाळापूर येथील 60 वर्षीय पुरुष रुग्णास दि. 22 रोजी दाखल करण्यात आले होते, दहिहांडा येथील 81 वर्षीय पुरुष रुग्णास दि. 27 रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच दोन जणांचे खाजगी रुग्णालयात मृत्यू झाले. त्यात मिर्झापूर अन्वी येथील 62 वर्षीय पुरुष असून त्याना दि. 23 रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य  येथील 72 वर्षीय महिला असून त्याना दि. 15 रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

  438 जणांना डिस्चार्ज

दरम्या आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 34, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील नऊ, अकोला ॲक्सीडेंट येथील दोन, ठाकरे हॉस्पीटल येथील चार, आयकॉन हॉस्पीटल येथील सहा, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, हॉटेल रिजेन्सी येथील सहा, बिहाडे हॉस्पीटल येथील एक, आधार हॉस्पीटल येथील एक, इंदिरा हॉस्पीटल येथील दोन, पाटील हॉस्पीटल येथील एक, कोविड केअर सेंटर येथील 54 तर होम आयसोलेशन मधील 315 असे एकूण 438 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

5244 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 39623(30759+8687+177) आहे. त्यात 678 मृत झाले आहेत. तर 33701 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 5244 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ