2188 अहवाल प्राप्त, 380 पॉझिटीव्ह, 594 डिस्चार्ज, नऊ मृत्यू

 


अकोला,दि.24(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2188 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1808  अहवाल निगेटीव्ह तर 380 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 594 जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर नऊ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

  त्याच प्रमाणे काल (दि.23) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 114 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 37203(28999+8027+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज दिवभरात एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 380रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 114 असे एकूण पॉझिटीव्ह 494 आहेत.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 194725नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 191893 फेरतपासणीचे 385 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2447   नमुने होते. आजपर्यंत एकूण 194500 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 165501 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

380 पॉझिटिव्ह

 आज  दिवसभरात ३८० अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १४२ महिला व २३८ पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-

मुर्तिजापुर-२५, अकोट-८६, बाळापूर-२६, तेल्हारा-१६, बार्शी टाकळी-नऊ, पातूर-२७, अकोला-१९१. (अकोला ग्रामीण-१८, अकोला मनपा क्षेत्र-१७३)

दरम्यान काल (दि. 23) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात  114 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

नऊ जणांचा मृत्यू

आज दिवसभरात नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात मलकापूर येथील ५८ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २२ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य कारंजा ता.मुर्तिजापूर येथील ५० वर्षीय महिला असून या रुग्णास दि. १३ रोजी दाखल करण्यात आले होते, दहिगाव बोरगाव मंजू येथील ६५ वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते, खदान येथील ६९ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते, तर मोठी उमरी येथील ६७ वर्षीय महिला असून या महिलेस दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते, वलगाव ता. बाळापूर येथील ४० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१७ रोजी दाखल करण्यात आले होते, शिवर  येथील ६५ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १७ रोजी दाखल करण्यात आले होते, चोहट्टा बाजार येथील ६४ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २१ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच महान येथील ५२ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २३ रोजी मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

594 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३५, हॉटेल रिजेन्सी येथील सहा, ओझोन हॉस्पीटल येथील एक, युनिक हॉस्पीटल येथील दोन, अकोला ॲक्सिडेंट येथील दोन, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय एक, सहारा हॉस्पीटल येथील दोन, पाटील हॉस्पीटल येथील दोन, इंदिरा हॉस्पीटल येथील दोन, उपजिल्हा रुग्णालय येथील एक, देवसार हॉस्पीटल येथील तीन, नवजीवन हॉस्पीटल येथील एक, कोविड केअर सेंटर अकोट येथील एक, तर होम आयसोलेशन मधील ५३५ असे एकूण ५९४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

6313  जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 37203(28999+8027+177) आहे. त्यात 619 मृत झाले आहेत. तर 30271 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 6313 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ