रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः १०५१ चाचण्यात ८० पॉझिटीव्ह

 अकोला,दि. ११(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.१०) दिवसभरात झालेल्या १०५१ चाचण्या झाल्या त्यात ८०  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

          काल दिवसभरात अकोला येथे चार चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही,   अकोट येथे ६५ चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, बाळापूर येथे २६ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बार्शीटाकळी येथे तीन चाचण्या झाल्या त्यात एकाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, पातूर येथे तीन चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तेल्हारा येथे २६ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.  मुर्तिजापूर येथे ८२ चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोला महानगरपालिकेमार्फत ७१९ चाचण्या झाल्या त्यात ४४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोला आय एम ए येथे ११ चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या २३ चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ८८ चाचण्या झाल्या त्यात २२  जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, हेडगेवार लॅब येथे एक चाचणी झाली ती निगेटीव्ह आली. असे  एकूण १०५१ चाचण्यात ८० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात ८२ हजार ६०२ चाचण्या झाल्या पैकी ६१७० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ