जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक; प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध
अकोला,दि.५(जिमाका)- राज्य निवडणूक आयोगाने सहा जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समित्यांमध्ये व्हावयाच्या रिक्त पदाच्या निवडणूकीसाठी प्रारुप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली असे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक विभागाचे प्रभारी अधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे. अकोला जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे १४ गट व त्याअंतर्गत २८ गणांत निवडणूक व्हावयाची आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने दि.१७ मार्च रोजी कार्यक्रम जाहीर केला आहे. यासंदर्भातील प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. संबंधित तहसिलदार कार्यालय व संबंधित कार्यालयात नोटीस बोर्डवर लावून प्रसिद्धी करण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा