इमारत बांधकाम कामगारांना नोंदणी शुल्क जमा करण्याचे आवाहन

 अकोला, दि.३० (जिमाका)- महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत दि. २२ एप्रिल  पर्यंत नोंदीत बांधकाम कामगारांना राज्य शासनाच्या मान्यतेनुसार कोविड-१९ विषाणुच्या प्रादुर्भाव कालावधीत १५०० रुपयांचे अर्थ सहाय्य देण्याचे घोषीत केले आहे. त्यानुसार मंडळाकडे जुलै २०२० ते २२ एप्रिल २०२१ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांपैकी ज्यांची नोंदणी फी वर्गणी मंडळाकडे लॉकडाऊनमुळे जमा करणे शक्य झाले नाही, अशा बांधकाम कामगारांना मंडळाचे स्मार्ट कार्ड देता आले नाही. अशा कामगारांनी त्यांची नोंदणी फी पंचवीस रुपये वर्गणी फी बारा रुपये खाली दिलेल्या मंडळाच्या दोन स्वतंत्र खात्यात जमा करावे, असे आवाहन महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई  यांनी केले आहे.

बाब

रक्कम रुपये

बँकेचे नाव

बँकेचे खाते क्रमांक

IFS C Code

नोंदणी  फी

२५/-

सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुंबई

3230821864

CBIN0282611

वर्गणी/ नुतणीकरण

१२/-

सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुंबई

3143044488

CBIN0282611

 

बांधकाम कामगारांनी  फी चा भरणा केल्यानंतर www.mahabocw.in  उघडल्यानंतर  याबाबत सुचना दिसुन येईल. सुचनेच्या खाली पैसे भरल्यानंतर येथे क्लिक करावे असे बटन दिलेले आहे. त्यावर क्लिक करुन फि भरल्याबाबतची  सविस्तर माहीती सादर करावी.  अकोला जिल्ह्यातील कामगारांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त राजू गुल्हाने यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ