महाडीबीटी प्रणालीः अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना २९ पर्यंत मुदतवाढ


अकोला,दि.१३(जिमाका)- सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती, विजा, भज,  इमाव, विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती, परीक्षा व शिक्षण फी साठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शनिवार दि.२९ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
                   तसेच भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण फी  परिक्षा  फी योजनेचे अजुनही बरेच अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबीत आहे. कार्यालयाने त्रृटीचे अर्ज महाविद्यालयाकडे परत केलेले असल्याने प्रलंबीत असलेले अर्जाची त्रृटीची पुर्तता करून घेण्यासाठी तसेच नविन अर्ज फॉरवर्ड करणेसाठी महाविद्यालयांना दि. ८ मार्च पर्यंत मुदत वाढवुन दिली आहे. या संधीचा लाभ  जिल्ह्यातील सर्व  महाविद्यालयांनी  घेऊन  प्रलंबीत अर्ज  दिलेल्या मुदतीत शासन निर्णयानुसार पडताळणी करून जिल्हा कार्यालयाकडे फॉरवर्ड करावेत. महाविद्यालयांनी जिल्हा  कार्यालयाकडे अर्ज फॉरवर्ड करतांना संपुर्ण अर्जाची पडताळणी करूनच अर्ज फॉरवर्ड करावेत.  त्रृटीचे अथवा अपुर्ण अर्ज फॉरवर्ड केल्यास विद्यार्थी अपुर्ण कागदपत्रा अभावी वंचित राहील्यास संपुर्ण जबाबदारी महाविद्यालयाची राहील याची नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अकोला यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज