मराठी भाषा गौरव दिन सुधाकरराव नाईक महाविद्यालयात आज (दि.27) कार्यक्रम



अकोला, दि.26(जिमाका)- कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वि. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त  आज गुरुवार           दि. 27 रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय अकोला व   सुधाकर नाईक कला , विज्ञान व उमाशंकर खेतान  वाणिज्य महाविद्यालय , अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 हा कार्यक्रम  सुधाकरराव नाईक  कला विज्ञान महाविद्यालय, तुकाराम चौक अकोला येथे गुरुवार दि.27 रोजी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सचिव बी.पी. पवार हे राहणार असून आकाशवाणी केंद्र अकोला चे कार्यक्रम विभागप्रमुख विजय दळवी हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी प्राचार्य डॉ. जयंत बोबडे,  मराठी विभागप्रमुख डॉ. भास्कर पाटील, प्रा. एन. एफ . चव्हाण , जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन महाविद्यालयाच्या वाड.मय मंडळाचे अध्यक्ष गणेश लोणकर यांनी केले आहे.             00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज