जिल्हा प्रशासनाचा अभिनय उपक्रम स्पर्धा परिक्षेत यशस्वी होण्यासाठी जिद्द ,‍चिकाटी व आत्मविश्वास आवश्यक -जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

            अकोला, दि. 10 (जिमाका):  स्पर्धा परिक्षांत यशस्वी होण्यासाठी मला करावयाचे आहे हा आत्मविश्वास, मी यशस्वी होईल  ही जिद्द  आणि दररोज 12 ते 13 तास अभ्यास करण्याची  चिकाटीची  आवश्यकता  असल्याचे प्रतिपादन  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
        आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वंयदिप अभियानातंर्गत स्पर्धा मार्गदर्शन  वर्गाचा शुभारंभ  जिल्हाधिकारी यांनी केला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी  नरेंद्र लोणकर , निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी राजेश  खवले, बाबासाहेब गाढवे,  शेलार, अनिल खंडागळे, अतुल दौड,  गजानन सुरंजे यांची प्रमुख उपस्थिती होती.
        स्पर्धा परिक्षेस यशस्वी होण्यासाठी किमान  3 वर्षेचा कालावधी लागतो. त्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. असे सांगुन जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय  सर्वांगसुंदर असुन  स्पर्धा परिक्षा मार्गदर्शनसाठी  याठिकाणी पुस्तके उपलब्ध आहेत. या ग्रंथालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
        जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी यांचा टक्का वाढावा यासाठी मागील चार वर्षापासुन जिल्हा प्रशासनातर्फे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन वर्ग प्रत्येक महिन्याच्या  पाच  तारखेला आयोजीत  करण्यात येतो. जिल्ह्यातील 30 प्रज्ञावंत विद्यार्थ्याची  निवड करून त्यांना दररोज 3 ते 4 तासात स्पर्धा परिक्षा बाबत मार्गदर्शन  देण्यात येणार आहे. यासाठी सुशांत  घुगे, निवृत्ती डांगरे अर्जुन देशमुख , श्याम  काटोले व शुभम बडगुजर या तज्ञ प्राध्यपकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच प्रशासनातील अधिकारी  वेळोवळी मार्गदर्शन  करणार असल्याची  माहिती   निवासी  उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
यावेळी बाबासाहेब गाढवे व अतुल  दौड  यांनी  मार्गदर्शन केले. तसेच सचिन  अडगांवकर व पुजा या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमास यशस्वी होण्यासाठी जिल्हा गुणवत्ता कक्षाचे समन्वयक  महल्ले  व स्वप्नील यांचे  सहकार्य लाभले  यावेळी स्पर्धा परिक्षेसाठी परिक्षेची तयार करणारे सुपर 30 विद्यार्थी  उपस्थित होते.
                                                                      00000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज