महामाहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दौ-याच्या तयारीसाठी आढावा बैठक




        अकोला,दि. 1 (जिमाका)-    मा. महामाहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बुधवार (दि. 5) रोजी  अकोला येथे डॉ.  पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठ येथे दिक्षांत समारंभासाठी दौ-यावर  येत आहेत.  दौ-याच्या  व्यवस्थेबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर  यांच्या उपस्थिती संबंधीत अधिका-यांची बैठक घेण्यात आली यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे, अपर पोलीस अधिक्षक  प्रशांत वाघोडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय  खडसे,  डॉ.  पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठाचे  कुलसचिव  डॉ. प्रकाश कडु, संचालक डॉ.  विलास खर्चे, उपविभागीय अधिकारी  डॉ.  निलेश अपार,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता  सुधिर  धिवरे,  तहसिलदार विजय  लोखंडे सह  संबंधीत विभागाचे  अधिकारी उपस्थित होते.
            मा. राज्यपाल यांच्या दौ-यानिमीत्त विविध विभागाकडे कामकाजाची विभागणी करण्यात आली.  सोपविण्यात  आलेली कामे  जबाबदारी वर  राज्याशोष्टाचाराप्रमाणे  कोणतीही दिरंगाई न करता पुर्ण करण्याबाबत सुचना जिल्हाधिकारी  यांनी दिल्यात.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज