मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम

अकोला,दि. 24 (जिमाका)- 30 अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघातील दि. 1 जानेवारी 2020 अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर झाला असून या कार्यक्रमाचे टप्पे याप्रमाणे-
                    पुनरिक्षण  कार्यक्रम मतदार पडताळणी कार्यक्रम (EVP) कॅम्पेन मोडमध्ये SVEEP च्या मदतीने आणि मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व  प्रमाणीकरण   सारख्या इतर पुर्वपुनरिक्षण कार्यक्रमाद्वारे-शनिवार दि.29 फेब्रूवारी पर्यंत,
एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसद्ध करणे शुक्रवार दि. 13 मार्च,
दावे  व हरकती स्विकारण्याचा कालावधी  शुक्रवार दि. 13 मार्च ते बुधवार दि. 15 एप्रिल,  
विशेष मोहिमांचा कालावधी शनिवार दि. 28 मार्च  आणि रविवार दि. 29 मार्चशनिवार दि. 11 एप्रिल आणि रविवार दि. 12 एप्रिल
दावे  व हरकती निकालात काढणे गुरूवार दि. 30 एप्रिल पुर्वी,
प्रारूप मतदार यादीच्या मापदंडाची तपासणी करणे  आणि मतदार यादीच्या  अंतिम प्रसिद्धी करीता आयोगाची परवाणगी घेणे बुधवार दि. 6 मे पुर्वी,   
डाटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी याद्यांची छपाई इत्यादी सोमवार दि. 11 मे   पुर्वी,
मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी   शुक्रवार दि. 15 मे .
याप्रमाणे आहे, असे उपजिल्हाधिकारी (महसुलतथा मतदार नोंदणी अधिकारी 30- अकोला (पश्चिमविधानसभा मतदार संघ यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज