किसान क्रेडीट कार्डसाठी 23 पर्यंत विशेष मोहिम


                 अकोला,दि.12(जिमाका):   जास्तीत जास्त शेतक-यांना किसान क्रेडीट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. येत्या 23 तारखेपर्यंत  ही मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धन व्यवसाय  करणा-या  शेतक-यांना किसान क्रेडीट कार्ड विशेषत्वाने  उपलब्ध करून दिले जाणार आहे. या संदर्भात  जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांच्यामार्फत  समन्वय राखुन हे   अभियान राबविण्यात येत आहे.
                                                              00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना