ज्ञानाला हवी कष्टाची जोड ;देशभक्तिचे आवरण- पालकमंत्री ना. कडू


अकोला,दि.२०(जिमाका)- पत्रकारांनी काय लिहावे? कोणासाठी लिहावे याचे भान असणे आवश्यक आहे. आपल्या ठायी असणाऱ्या ज्ञानाला कष्टाची जोड आणि देशभक्तीचे आवरण असल्याशिवाय ज्ञानाची महती निर्माण होत नाही, असे प्रतिपादन राज्याचे  जलसंपदा व लाभक्षेत्र विकास , शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे केले.
येथील महाराष्ट्र  साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेच्या वतीने मूकनायक पत्रकार दिन व विभागीय  मेळावा आयोजित करण्यात आला होता.  या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतिभाताई भोजने यांची उपस्थिती होती.  यावेळी ना. बच्चू कडू यांच्या हस्ते  विविध कामगिरी केलेल्या पत्रकारांना गौरविण्यात आले.  या कार्यक्रमाला जिल्ह्यातील ग्रामिण भागातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज