दि.१४ ते २७ या कालावधीत स्थानिक पातळीवर अधिकार प्रदान


अकोला,दि.१३ (जिमाका):    आगामी काळात आयोजित होणाऱ्या विविध उत्सवांच्या काळात जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्र.पोलीस अधिक्षक  यांनी त्यांना मुंबई पोलीस अधिनियम कलम ३६  नुसार  प्राप्त अधिकारान्वये जिल्ह्यातील सर्व पोलीस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांना शुक्रवार, दि.१४ ते गुरूवार,दि. २७ च्या मध्यरात्री पर्यंत स्थानिक पातळीवर अधिकार प्रदान केले आहेत. त्यानुसार,  या कालावधीत हे अधिकारी स्थानिक पातळीवर रस्त्यावरून जाणाऱ्या मिरवणूकीतील किंवा जमावातील लोकांच्या वर्तुणूकीविषयी निर्देश देणे, मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी अडथळा होवू न देणे, मिरवणूकांचे मार्ग निश्चित करणे , सार्वजनिक जागी बंदोबस्त व सुव्यवस्था राखणे, वाद्य वाजविण्याचे,सार्वजनिक जागेत ध्वनीक्षेपकाचा  (लाउुडस्पीकर) उपयोग करण्याचे नियम व करणे व त्यावर नियंत्रण करणे, तसेच सक्षम अधिकाऱ्यांनी या अधिनियमांचे कलम ३३,३६,३७ ते ४०,४२,४३,४५ अन्वये केलेल्या कोणत्याही आदेशास अधीन व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश स्थानिक पातळीवर देता येणार आहे. त्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती शिक्षेस पात्र असेल असे आदेश  जिल्हा पोलीस अधिक्षक अमोघ गावकर यांनी दिले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज